प्रियंका चोप्रा ते करिना कपूरपर्यंत 'या' सेलिब्रिटींनी बोर्डिंग स्कूलमधून घेतलं शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 07:44 PM2023-12-15T19:44:08+5:302023-12-15T19:53:55+5:30

सेलिब्रिटींनी देशातील विविध बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहेत.

नुकतंच प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी प्रियंकाला लहानपणी बोर्डिंग स्कुलमध्ये पाठवण्याबाबतीत खुलासा केला आहे. 'तो माझ्या आयुष्यातला सर्वात चुकीचा निर्णय होता', असे मधु चोप्रा म्हणाल्या. प्रियंकाने लखनऊच्या ला मार्टिनियर गर्ल्स प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.

करीना कपूरने डेहराडूनच्या बोर्डिंग स्कूल वेल्हम गर्ल्समधून शिक्षण घेतलं. तिने वेल्हॅममधून डिग्री घेतली आणि मुंबईत परतली. कौटुंबिक पार्श्वभूमी चित्रपटांची असल्याने करीनाही याच क्षेत्रात आली.

सैफ अली खानने हिमाचल प्रदेशातील सनावरमधील लॉरेन्स स्कूलमधून शिक्षण पुर्ण केले. हे सर्वांत जुन्या बोर्डिंग शाळांपैकी एक आहे.

अमिताभ बच्चन यांनी नैनितालच्या शेरवुड कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. काही वर्षांपूर्वी इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बिग बी यांनी त्या शाळेत नाटकं कशी सादर केली, याबद्दल सांगितले होते. तेथूनच अभिनयाची आवड निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले होते.

काजोलने पाचगणी येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले. पण अभिनयासाठी वयाच्या १६ व्या वर्षीच तिने शिक्षण सोडले.

सलमान खानने त्याचा भाऊ अरबाज खानसोबत ग्वाल्हेरमधील प्रतिष्ठित द सिंधिया स्कूलमध्ये शिक्षण घेतले होते. बिग बॉस ओटीटी फिनालेदरम्यान त्याने बोर्डिंग स्कूलच्या दिवसांबद्दल सांगितले.

करण जोहरनेही बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले. पण, बोर्डिंग स्कूलमध्ये त्याच्यासोबत रॅगिंग झाल्याचे त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. शिवाय करणने बोर्डिंग स्कूलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण शाळेच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडले होते.

ट्विंकल खन्नादेखील शिक्षणासाठी घरापासून दूर राहिली होती. करण जोहर आणि ट्विंकल हे दोघे एकाच बोर्डिंग स्कूलमध्ये होते. ट्विंकल खन्नाने तिच्या आत्मचरित्रामध्ये याबद्दल लिहले आहे.

विजय देवरकोंडानेही पुट्टापर्थी येथील श्री सत्य साई उच्च माध्यमिक विद्यालय या बोर्डिंग स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.