'परदेस' फेम अभिनेत्री महिमा चौधरीच्या लेकीला पाहिलंत का? ग्लॅमरच्या दुनियेत स्टारकिड्सला देतेय टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 15:37 IST2026-02-02T14:17:58+5:302026-02-02T15:37:19+5:30

'परदेस' फेम अभिनेत्री महिमा चौधरी हिने ९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावले होते. परंतु आता महिमा नव्हे तर तिच्या मुलीची चर्चा आहे.

'परदेस' फेम अभिनेत्री महिमा चौधरी हिने ९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावले होते. परंतु आता महिमा नव्हे तर तिच्या मुलीची चर्चा आहे.

महिमा चौधरीच्या मुलीचं नाव अरिना असं आहे. सौंदर्य आणि ग्लॅमरच्या बाबतीत अरिनाने आईलाही मागे टाकलं आहे, असं चाहत्यांचं म्हणणं आहे.

नुकत्याच समोर आलेल्या एका कार्यक्रमातील फोटोंमध्ये अरिना इतकी सुंदर दिसत आहे की, नेटकऱ्यांनी तिची तुलना चक्क हॉलिवूड स्टार सेलेना गोमेझशी (Selena Gomez) करण्यास सुरुवात केली आहे.

यावेळी अरिनाने परिधान केलेला ड्रेस आणि तिचा एकूणच 'रॉयल' अंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. आईप्रमाणेच तिच्यातही एक सौंदर्याची वेगळीच चमक दिसून येत होती.

अरिनाचे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला. काहींनी तिची तुलना महिमा चौधरीच्या तरुणपणातील 'परदेस'मधील लूकशी केली.

"सौंदर्याच्या बाबतीत तिने आपल्या आईलाही मागे टाकले आहे," अशा आशयाच्या कमेंट्स अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत.

अरिना सध्या आपल्या शिक्षणात व्यस्त असली, तरी तिच्या या वाढत्या लोकप्रियतेमुळे ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.