अमिताभ बच्चनची सून झाल्यानंतर कंपन्या बंद का केल्या? 6 तासात ED ने ऐश्वर्याला विचारले 'हे' प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 03:05 PM2021-12-21T15:05:33+5:302021-12-21T15:16:03+5:30

Aishwarya rai: सोमवारी दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात ऐश्वर्याची कसून चौकशी करण्यात आली. जवळपास ६ तास ईडीने ऐश्वर्याची चौकशी केली.

Panama Papers Leak: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी ऐश्वर्याला ED ने चौकशीचे समन्स बजावले होते.

सोमवारी दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात ऐश्वर्याची कसून चौकशी करण्यात आली. जवळपास ६ तास ईडीने ऐश्वर्याची चौकशी केली.

६ तास झालेल्या या चौकशीमध्ये ऐश्वर्याला नेमके कोणते प्रश्न विचारले? तिच्यावर कोणते आरोप करण्यात आले आहेत? किंवा हे नेमकं काय प्रकरण आहे असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. त्यामुळेच ईडीने केलेल्या चौकशीत ऐश्वर्याला कोणत्या प्रश्नांचा सामना करावा लागला ते जाणून घेऊयात.

पनामा पेपर लीकनुसार, २००४ मध्ये ऐश्वर्याच्या नावाने एक कंपनी रजिस्टर करण्यात आली होती. याच कंपनीविषयी काही प्रश्न ईडीने ऐश्वर्याला विचारले.

ऐश्वर्यावर करण्यात आलेल्या आरोपांनुसार,या कंपनीसाठी ५० हजार डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली होती. या कंपनीमध्ये ऐश्वर्याव्यतिरिक्त तिची आई आणि भाऊ आदित्य राय यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येतं.

या कंपनीचे निम्म्याहून जास्त शेअर्सदेखील त्यांच्याच नावावर आहेत. इतकंच नाही तर २००५ मध्ये ऐश्वर्याला डायरेक्टर पदावरुन हटवत थेट शेअर होल्टरही करण्यात आलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, ऐश्वर्याने ही कंपनी सुरु करण्यासाठी एवढी मोठी रक्कम कशी उभी केली? हा प्रश्न ED ने तिला विचारला.

२००५ साली ऐश्वर्याला डायरेक्टर पदावरुन थेट शेअर होल्डर कसं काय केलं? तसंच यामुळे तिला काय फायदा झाला? तसंच हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी कायदेशीर परवानगी घेतली होती का?

केवळ ५० हजार डॉलर्समध्ये खरेदी केलेली कंपनी १५०० डॉलर्समध्ये कशी काय विकली? तसंच अमिताभ बच्चन यांची सून झाल्यानंतर या कंपन्या बंद का केल्या?असे प्रश्न ऐश्वर्याला या ६ तासांमध्ये विचारण्यात आले.

ऐश्वर्याप्रमाणेच अमिताभ बच्चन हेदेखील EDच्या रडारवर आहेत. बिग बींवरदेखील मोठी रक्कम विदेशात नेल्याचा आरोप आहे. तसंच त्यांनी विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचं म्हटलं जात आहे.तसंच बच्चन कुटुंबाने ही गुंतवणूक करतांना कोणतीही कायदेशीर परवानगी न घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जवळपास ४ वर्षांपूर्वीच या प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात झाली होती. या काळात अभिषेक बच्चनची देखील चौकशी करण्यात आली होती.