Palak Tiwari : "मी माझ्या आईशी..."; पलक तिवारी कोणाला करतेय डेट, का आली चेहरा लपवण्याची वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:49 IST2025-03-24T17:33:47+5:302025-03-24T17:49:59+5:30

Palak Tiwari : कमी वयातच पलक खूप लोकप्रिय झाली आहे.

श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी ही तिच्या आईप्रमाणेच खूप प्रसिद्ध आहे. तिच्या ग्लॅमरस लूकने ती नेहमीच लोकांचं लक्ष वेधून घेत असते.

कमी वयातच पलक खूप लोकप्रिय झाली आहे. सैफ अली खानच्या मुलासोबत तिचं नाव सध्या जोडलं जात आहे. पण तिने डेटिंग करत असल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

पलक तिवारी एकदा इब्राहिमसोबत दिसली होती. तेव्हा ती खूपच जास्त घाबरली. आईला समजलं तर काय होईल याची तिला भीती वाटत होती.

पलकने स्वत:च सांगितलं की, ती आईसोबत खोटं बोलून बाहेर प़डली होती. ती इब्राहिमला डेट करत नाही तर ती आईमुळे लपत होती.

"इब्राहिम आणि मी फक्त खूप चांगले मित्र आहोत. आम्ही रिलेशनशिपमध्ये असल्याची न्यूज खोटी आहे आणि म्हणूनच मी या गोष्टीकडे कधी लक्ष दिलं नाही."

"माझी आई श्वेता तिवारीमुळे मी माझ्या चेहरा लपवत होती. कारण मी तिच्यासोबत एक तासाआधीच मी घरी येण्यासाठी निघाली आहे असं खोटं बोलली होती."

"जेव्हा पापाराजींनी फोटो काढण्यास सुरुवात केली तेव्हा मला वाटलं की, फोटो पाहून आईला सर्व समजेल. तिनेच मला एक फोटो पाठवला आणि खोटारडी मुलगी असं म्हणाली."

"मी आईची यासाठी माफी मागितली. मी माझा चेहरा इतर कोणासाठी नाही तर श्वेता तिवारीने पाहून नये म्हणून लपवला होता" असं पलकने सांगितलं.

श्वेता आणि पलक तिवारीची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली असते. त्या दोघीही सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात.