पाकिस्तानी फॅन शिरला होता हेमा मालिनी यांच्या घरात, धक्क्याने वडिलांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 07:24 PM2024-02-23T19:24:14+5:302024-02-23T19:45:24+5:30

स्टारडमुळे एक दुर्दैवी घटना हेमा मालिनी यांच्या आयुष्यात घडलेली आहे.

बॉलिवूडमधील ड्रीम गर्ल म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांनी अनेक ब्लॉकब्लस्टर चित्रपट दिले आहेत. प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत त्यांचे स्थान अव्वल आहे.

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणाऱ्या हेमा यांची लोकप्रियता आजही कायम आहे.

हेमा मालिनी यांना तर ‘ड्रिम गर्ल’च म्हटलं जातं. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात.

त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. देशातच नाही तर विदेशातही हेमा मालिनी यांचे फॅन आहेत.

स्टारडमुळे त्यांच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली होती. 1968 मध्ये हेमा मालिनी यांच्या घरी पाकिस्तानी चाहता घुसला होता.

हेमा मालिनी यांचा चाहता पाकिस्तानातून मुंबईत त्यांची एक झलक पाहण्यासाठी आला होता. पण तो त्यांना अनेक महिने भेटू शकला नाही.

अखेर एकदिवस रात्री तो थेट हेमा मालिनी यांच्या घरात घुसला. चाहत्याला पाहून हेमा यांची मोलकरीन ओरडू लागली. घाबरलेल्या पाकिस्तानी चाहत्यानं टेबलवर असलेला चाकू हातात घेतला.

काय झालं हे पाहण्यासाठी हेमा मालिनी यांचे वडील आले. हे सगळं पाहून पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न करत असलेले हेमा मालिनी यांचे वडील अचानक खाली पडले. डॉक्टरांना बोलवण्यात आल्यानंतर त्यांचे हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याचे सांगितले.

वडिलांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी स्वत: ला जबाबदार ठरवलं होतं. त्यानंतर त्यांनी अनेक महिने स्वत: ला एका खोलीत बंद केलं होतं या घटनेनंतर हेमा मालिनी यांचे न भरून येणारं नुकसान झालं होतं.

आज हेमा मालिनी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी त्यांची चर्चा मात्र कायम रंगत असते.