सुपरहिट ठरलेलं 'नाटू नाटू' गाणं 'या' व्यक्तीने केलंय कोरिओग्राफ; जाणून घ्या कोण आहे तो नृत्यदिग्दर्शक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 12:45 PM2023-03-13T12:45:57+5:302023-03-13T12:51:26+5:30

Oscars 2023: या गाण्यात ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांनी केलेली सिग्नेचर स्टेप तुफान लोकप्रिय झाली असून हे गाणं कोणी नृत्यदिग्दर्शित केलं हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सध्या संपूर्ण देशभरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. ऑस्कर शर्यतीमध्ये भारताने बाजी मारली आहे.

एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ओरिजिनल सॉन्ग कॅटेगरीत नाटू नाटूला हा पुरस्कार मिळाला आहे.

RRR मधील नाटू नाटू हे गाणं रिलीज झाल्यापासून तुफान गाजलं होतं. आता तर या गाण्याने थेट ऑस्करपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची आणि नाटू नाटू गाण्याची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर या गाण्याची चर्चा होत असतानाच हे गाणं कोरिओग्राफ करणाऱ्या नृत्यदिग्दर्शकाचीही चर्चा होत आहे.

या गाण्यात ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांनी केलेली सिग्नेचर स्टेप तुफान लोकप्रिय झाली असून हे गाणं कोणी नृत्यदिग्दर्शित केलं हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

नाटू नाटू हे गाणं प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक प्रेम रक्षित यांनी कोरिओग्राफ केलं आहे.

प्रेम रक्षित साऊथमधील लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक असून त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी कोरिओग्राफी केली आहे.

२००५ मध्ये प्रेम रक्षित यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

प्रेम रक्षित यांनी 'रेडी', 'मगधीरा', 'शक्ति', 'लवली', 'बाहुबली' आणि 'गली रावड़ी' यांसारख्या सिनेमांसाठी कोरिओग्राफी केली आहे.