PHOTOS: ब्लॅक बोल्ड हाय स्लिट ड्रेस घालून नोरा फतेहीचा कहर, चाहत्यांचा कलेजा खल्लास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:19 IST2025-02-07T17:15:34+5:302025-02-07T17:19:39+5:30
लेटेस्ट फोटोशूटमध्ये नोरा जबरदस्त आणि हॉट पोझ देताना दिसत आहे.

अभिनेत्री नोरा फतेहीने नुकतेच एक हॉट फोटोशूट केले होते, ज्याचे फोटो तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले
या फोटोंमध्ये नोरा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
हाय स्लिट ड्रेसवर नोराने मिनिमल मेकअप केलाय. तिने कोणतीच अधिकची ज्वेलरी परिधान केली नाही.
कानात सुंदर साजेसे कानातले आणि केवळ मेकअपनेच एकदम जबरदस्त टच आपल्या लुकला दिला. तर केसांना वेह्व्स स्टाईलमध्ये ओपन ठेवलं.
तिचा हा लुक पाहून चाहते इतके घायाळ झाले की तिच्या या लुकवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव पडला.
नोरा फतेहीने आपल्या अभिनयाच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नोरा फतेही तिच्या आयटम नंबर्समुळे प्रसिद्ध आहे. 'हाय गर्मी' किंवा 'दिलबर दिलबर' ही तिची गाणी लोकप्रिय आहेत.
नोरा फतेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांसाठी ती नेहमीच काही ना काही फोटोज, व्हिडीओ पोस्ट करते.
नुकतंच तिचं 'स्नेक' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. ज्याचे ती प्रमोशन करताना पाहायला मिळतेय.