बिना खिलौनों के बचपन बीता है...; नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर झाला भावुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 06:03 PM2021-06-28T18:03:30+5:302021-06-28T18:17:01+5:30

एका चाहत्याने टोनीचे कौतुक केले आणि या कौतुकाच्या शब्दांनी टोनीला भावुक केले...

नेहा कक्करचा भाऊ सिंगर टोनी कक्कर सध्या ‘नंबर लिख’ या म्युझिक व्हिडीओमुळे चर्चेत आहे.

टोनी त्याच्या गाण्यांमुळे अनेकदा ट्रोल होतो. पण त्याने कधीच या ट्रोलिंगची पर्वा केली नाही. पण अलीकडे एका चाहत्याने टोनीचे कौतुक केले आणि या कौतुकाच्या शब्दांनी टोनीला भावुक केले.

टोनीने चाहत्यांसाठी आस्क मी एनिथिंग सेशन ठेवले. यादरम्यान एका चाहत्याने टोनीचे भरभरून कौतुक केले.

टोनी, तू खरंच ग्रेट आहेस. तू अतिशय शांतपणे व संयमाने टीकाकारांना हाताळतो. तू एकदम कूल आहेस, असे या चाहत्याने लिहिले. चाहत्याच्या या शब्दांनी टोनी अचानक भावुक झाला.

या चाहत्याला उत्तर देताना टोनीने लिहिले, कुछ तो लोग कहेंगे... संगीताने मला काय दिले, हे मला ठाऊक आहे. घर, कार, सर्वकाही.... नाहीतर अख्ख बालपण खेळण्यांशिवाय गेलं...., असं टोनीनं लिहिलं.

टोनी कक्करचे बालपण अतिशय गरिबीत गेले. टोनी बहिणींसोबत मातेच्या जागरणात गायचा. यातून जे काही पैसे मिळायचे, त्यातून घराचा खर्च चालायचा.

नेहा कक्करने अनेकदा तिची व तिच्या भावंडांची स्ट्रगल स्टोरी सांगितली आहे. वडील समोसे विकायचे आणि एका भाड्याच्या एकाच खोलीत हे अख्खे कुटुंब राहायचे.

90 च्या दशकात टोनी कक्कर कुटुंबासोबत मुंबईत आला. यादरम्यान तो गाणं कम्पोज करणे शिकला आणि कंम्पोजर संदीप चौता यांच्यासाठी काम करू लागला. आज टोनीची वर्षाला 6-7 गाणी येतात. त्याच्या गाण्यांचा एक खास चाहता वर्ग आहे.