मुंबईची ऐश्वर्या थेट प्रभासच्या 'स्पिरिट'मध्ये झळकणार! याआधी रणवीर सिंगसोबत केलंय काम, बोल्ड फोटोंची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 10:29 IST2026-02-28T10:19:55+5:302026-02-28T10:29:07+5:30
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि 'अॅनिमल' फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी 'स्पिरिट' (Spirit) या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटात मुंबईची ऐश्वर्या झळकणार आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि 'अॅनिमल' फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी 'स्पिरिट' (Spirit) या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटात मुंबईची ऐश्वर्या झळकणार आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या देसाई या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे समोर आले असून तिचा फर्स्ट लूक निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे

संदीप रेड्डी वांगा यांच्या चित्रपटात महिला पात्रांना एक वेगळ्याच पद्धतीने मांडले जाते, त्यामुळे ऐश्वर्या या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका साकारणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

मूळची गुजरातची रहिवासी असलेल्या ऐश्वर्याला गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषा येत आहेत. ऐश्वर्या मुंबईत स्थायिक आहे, परंतु वेब सीरिज, चित्रपट आणि मॉडेलिंगसाठी मुंबई, न्यूयॉर्क शहर आणि वॉशिंग्टन डीसी दरम्यान वारंवार प्रवास करते.

ऐश्वर्याचे सोशल मीडियावर अनेक बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात. ऐश्वर्याला 'स्पिरिट' च्या माध्यमातून मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळतेय.

विशेष म्हणजे या सिनेमात ऐश्वर्यासोबत विवेक ओबेरॉय, तृप्ती डिमरी हे कलाकारही झळकणार आहेत. याआधी ऐश्वर्याने रणवीर सिंगसोबत gully boy सिनेमात काम केलंय

ऐश्वर्या देसाईच्या एन्ट्रीनंतर आता 'स्पिरिट'च्या स्टारकास्टबद्दलच्या चर्चांना उधाण आले असून, चाहते आता प्रभासच्या फर्स्ट लूकची आतुरतेने वाट पाहत आहेत.

















