१२ वर्षांपासून लग्न न करता 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहतेय मराठी अभिनेत्री, म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:03 IST2025-07-04T11:53:35+5:302025-07-04T12:03:07+5:30

ही जोडी जोडी अनेक वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत आहे. मात्र दोघांनी अद्याप लग्न केलेलं नसून त्यांचा तसा विचारही नाहीये.

मराठमोळी मुग्धा गोडसे (Mugdha Godse) एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

मुग्धानं २००४ मधील फेमिना मिस इंडिया स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर तिनं मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मॉडेलिंगनंतर तिनं अभिनयामध्येही नशीब आजमावलं. मधुर भंडारकर यांच्या 'फॅशन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

'फॅशन' चित्रपटात मुग्धानं प्रियंका चोप्रासोबत स्क्रीन शेअर केली होती. विशेष गोष्ट म्हणजे या सिनेमातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता. यानंतर तिनं 'ऑल द बेस्ट', 'जेल', 'हिरोईन', यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

सध्या ती तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मुग्धा गोडसे ही गेल्या १२ वर्षांपासून एका बॉलिवूड अभिनेत्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहते आहे. मात्र दोघांनी अद्याप लग्न केलेलं नसून त्यांचा तसा विचारही नाहीये.

तो अभिनेता आहे राहुल देव (Rahul Dev). मुग्धा आणि राहुल हे दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. एकमेंकावरील प्रेम व्यक्त करण्यात ते कुठेही कसर सोडत नाहीत.

नुकतंच मुग्धा आणि राहुल देव यांच्या रिलेशनशिपला (Mugdha Godse Living With Rahul Dev) १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. मुग्धानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

मुग्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा व राहुलचा हा फोटो पोस्ट करत '१२ वर्षे' असं कॅप्शन दिलं आहे. तिनं या पोस्टमध्ये राहुल देवला टॅग केलं आहे. यावर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्यात

विशेष म्हणजे मुग्धा आणि राहुल देवमध्ये वयाचं १८ वर्ष असं मोठं अंतर आहे. २६ जुलै १९८६ रोजी जन्मलेली मुग्धा ही ३८ वर्षाची आहे. तर राहुल देवचा जन्म २७ सप्टेंबर १९६८ रोजी झाला होता. तो सध्या ५६ वर्षांचा आहे.

मुग्धासोबत रिलेशनशिपच्या आधी राहुल देवचं राहुल देवचं रीनाशी लग्न झालं होतं. पण, २००९ साली रीनाचं कॅन्सरने निधन झालं. राहुल आणि रीना यांना एक मुलगाही आहे.

रीनाच्या निधनाच्या काही वर्षांनी राहुल देवच्या आयुष्यात मुग्धा आली. मुग्धाशी भेटल्यावर तो तिच्या प्रेमात पडला. २०१५ साली दोघांनी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.