Mrunal Thakur: मृणाल ठाकुरने निळ्या लेहेंग्यात शेअर केले Photos, तिच्या लूकवर चाहतेही फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 13:27 IST2024-12-29T13:03:50+5:302024-12-29T13:27:05+5:30

मृणाल कायमच तिच्या स्टाईलने सर्वांना प्रेमात पाडते.

मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकुरच्या (Mrunal Thakur) सौंदर्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. 'सीतारामम' सिनेमातून सर्वांनाच तिने प्रेमात पाडलं होतं.

मृणाल सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. तिचे इन्स्टाग्रामवर १३ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

मृणालने नुकतंच निळ्या लेहेंग्यातील काही फोटो पोस्ट केलेत. या डिझायनर लेहेंग्यात तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.

सुंदर डिझायनर ब्लाऊज, निळा लेहेंगा, त्यावर उत्कृष्ट कोरीव काम यामध्ये मृणाल अगदी उठून दिसत आहे.

मोकळे लांबसडक केस, कर्व्ही फिगर, तजेलदार त्वचा आणि टू द पॉइंट मेकअप यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे. तिच्या डोळ्यांचा मेकअप विशेष लक्ष वेधून घेणारा आहे.

त्यातच कानात, हातात आकर्षक अँटिक ज्वेलरी आहेत. तिच्या हातातील अँटिक मिनी पर्सही लक्ष वेधून आहे.

मृणालने या लूकमध्ये किलर पोज दिल्या आहेत. तिच्या या फोटोशूटला नेटकऱ्यांचीही चांगलीच पसंती मिळाली आहे.