निरागस चेहरा अन् गोड हास्य !'मिस्टर इंडिया'तील क्युट टीना आठवते? ३८ वर्षात इतका बदलला लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:42 IST2026-03-11T15:15:41+5:302026-03-11T15:42:21+5:30
'Mr. India' ची छोटी टिना आता दिसते भलतीच ग्लॅमरस, फोटो पाहून प्रेमातच पडाल

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक बालकलाकार पाहायला मिळतील,ज्यांनी मोजक्याच निवडक चित्रपटांतून अभिनय केला. छोट्या भूमिकातूनही प्रेक्षकांच्या लक्षात राहिले पण नंतर अज्ञातवासात हरवून गेले.अशाच एका बालकलाराबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुख्य भूमिका असलेला 'मिस्टर इंडिया'हा ब्लॉकबस्टर चित्रपट १९८७ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अनिल कपूरने एका सामान्य माणसाची भूमिका साकारलेली; जो घड्याळ घातल्यानंतर अदृश्य होत असे.

बोनी कपूर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३८ वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात लहान मुलांची फौज दाखवण्यात आली होती. भरपूर कॉमेडी, अॅक्शन आणि रोमान्सने परिपूर्ण असलेल्या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्यासह एक चिमुरडी मुलगी भाव खाऊन गेली होती.

त्या सर्व लहान मुलांमध्ये जर कोणी लक्षात राहिलं असेल, तर ते म्हणजे, चिमुकली 'टीना'चं पात्र. आपल्या निरागसतेने तिने सगळ्यांची मनं जिंकली. या चित्रपटातील त्या भूमिकेने या बालकलाकार मुलीला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

'मिस्टर इंडिया'मधील त्या मुलीचं खरं नाव हुजान खोदाईजी आहे. आता ३८ वर्षानंतर ती गोड मुलगी खूपच सुंदर दिसते. तिला चाहते ओळखूही शकणार नाही.

हुजान खोदाईजी इंस्टाग्रामवर असून ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण, तिनं आपली फ्रोफाईल प्रायव्हेट ठेवली आहे. हुजान खोदाईजीचे हे फोटो पाहिल्यानंतर लोक पुन्हा एकदा तिच्या निरागसतेवर फिदा झाले आहेत.

'मिस्टर इंडिया' सिनेमात काम केल्यानंतर हुजान इंडस्ट्रीतून गायबच झाली. मिडिया रिपोर्टनुसार, हुजान मार्केटिंग क्षेत्रात सक्रिय आहे.

काही वर्षापूर्वीच एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिस्टर इंडियातील कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यादरम्यान, हुजान पहिल्यांदा माध्यमांसमोर आली.

















