Photos: मौनी रॉयचं अफलातून ट्रान्सफॉर्मेशन; १४ वर्षात लूकमध्ये झाला जबरदस्त बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 02:37 PM2021-09-28T14:37:02+5:302021-09-28T15:46:58+5:30

Mouni roy: अभिनयासोबतच कथ्थक नृत्याचे धडे घेणारी मौनी एक उत्तम गायिकादेखील आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि सुपर स्टायलिश अभिनेत्री मौनी रॉय आज तिचा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. अभिनयासोबतच कथ्थक नृत्याचे धडे घेणारी मौनी एक उत्तम गायिकादेखील आहे.

छोटा पडदा गाजवल्यानंतर मौनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

जवळपास १४ वर्षांपासून मौनी कलाविश्वात सक्रीय असून तिच्या या गेल्या काही काळात प्रचंड बदल झाला आहे.

मौनीचा जन्म पश्चिम बंगालमधील कूच बिहार येथे झाला आहे. मौनीचे आई-वडीलदेखील कलाविश्वाशी निगडीत आहेत.

कूच बिहारमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या मौनीने तिचं पुढील शिक्षण दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथे केलं. मात्र, अर्ध्यावर शिक्षण सोडून तिने कलाविश्वात पदार्पण केलं.

'रन' चित्रपटात तिने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं. त्यानंतर एकता कपूरच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेतून छोट्या पडद्यावर अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं.

त्यानंतर 'देवों के देव महादेव' या मालिकेत झळकल्यानंतर तिच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली. त्याचबरोबर तिचा लूकदेखील दिवसेंदिवस बदलल्याचं पाहायला मिळालं.

प्रसिद्धी मिळत असतानाचा मौनीच्या चेहऱ्यात किंचितसा बदल जाणवल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केलं होतं.

मौनी सध्या तिच्या फिटनेसकडे लक्ष देत असून ती प्रचंड स्लिम ट्रीम असल्याचं दिसून येतं.

सध्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत मौनीचं नाव घेतलं जातं.