बहरलेलं शिवार अन् डोलणाऱ्या भाताच्या लोंबी; 'Miss Universe'ने फोटोशूटसाठी निवडलं सर्वोत्तम ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 17:18 IST2024-08-23T17:09:20+5:302024-08-23T17:18:45+5:30

'मिस युनिव्हर्स २०२१' हरनाज कौर संधू तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

हरनाज 'मिस युनिव्हर्स' झाल्यानंतर सर्वत्र तिची चर्चा होऊ लागली.

'मिस युनिव्हर्स' होणारी ती तिसरी भारतीय आहे. तिच्याआधी सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांनी हा बहुमान मिळवला होता.

वयाच्या २१ व्या वर्षी तिने 'मिस युनिव्हर्स'च्या मुकूटावर आपलं नाव कोरलं.

नुकतेच हरनाज कौर संधूने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये पंजाबी कुडीचा देसी लूक पाहायला मिळतो. बहरलेल्या शेतात बसून हरनाजने हे फोटोज क्लिक केले आहेत.

गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, कानात डौलदार झुमके असा साधा लूक तिने केला आहे. हरनाजचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

"Kudi Shiv di Kitaab Wargi..." असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. 'मिस युनिव्हर्स'च्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.