वयाच्या ३९ व्या वर्षीच 'आजी' झाली 'ही' अभिनेत्री, हृतिकसोबत रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:43 IST2024-12-19T14:27:38+5:302024-12-19T15:43:43+5:30

एक बॉलिवूड सिनेमा करुन मायदेशी परतली ही अभिनेत्री

अभिनेता हृतिक रोशनचा २०१४ साली घटस्फोट झाला. सुझैन खानसोबतचा १४ वर्षांचा संसार मोडला. घटस्फोटाआधीच हतिक आणि कंगना रणौतच्या अफेअरच्या चर्चा झाल्या होत्या. मात्र कंगनाशिवाय हृतिकचं आणखी एका अभिनेत्रीसोबत नाव जोडलं गेलं होतं.

ती अभिनेत्री आहे बार्बरा मोरी (Barbara Mori). २०१० साली आलेल्या 'काईट्स' सिनेमात हृतिक, बार्बरा आणि कंगना रणौत तिघेही होते. मूळ मेक्सिकन असलेल्या बार्बराने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिच्या सौंदर्याने भारतीयांना वेड लावलं होतं.

काईट्स नंतर बार्बरा पुन्हा हिंदी सिनेमात दिसलीच नाही. हा सिनेमाही बॉक्सऑफिसवर फ्लॉप झाला होता. सध्या बार्बरा भारतापासून दूर तिचं आयुष्य जगत आहे.

बार्बरा मेक्सिकन सिनेमांमध्ये काम करते. मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती चर्चेत असते. ती आता ४१ वर्षांची आहे. पण तुम्हाला माहितीये का वयाच्या ३९ व्या वर्षीच ती आजी झाली.

बार्बराचा जन्म १९७८ सालचा. १९९६ साली ती Sergio Mayer सोबत रिलेशनशिपमध्ये होती. १९९८ साली तिला मुलगाही झाला. sergio mayer mori असं त्याचं नाव आहे. तेव्हा बार्बराचं वय २० च वर्ष होतं.

बार्बराचा मुलगा Sergio mayer mori ला २०१६ साली त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडपासून एक मुलगी झाली. त्यामुळे बार्बरा वयाच्या ३८ व्या वर्षीच आजी झाली.

बार्बरा आणि sergio चं नातं मुलगा झाल्यानंतरच तुटलं होतं. २०१६ साली बार्बराने बास्केटबॉल प्लेयर केनेथ रे सिगमन(Kenneth Ray Sigman) सोबत लग्न केलं. मात्र एका वर्षात २०१७ मध्येच त्यांचा घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतर बार्बरा एकटीच आयुष्य जगत आहे. मेक्सिकन सिनेमांमध्ये ती दिसत आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टला हृतिक रोशनचे लाईक्स आजही असतात.

बार्बरा सध्या फिल्ममेकर फर्नांडो रोवझरला डेट करत आहे. बॉयफ्रेंडसोबत अनेकदा ती फोटो शेअर करत असते.