गुलाबी रंगाच्या साडीत खुललं मानुषी छिल्लरचं सौंदर्य, खास लूक चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 17:56 IST2024-02-09T17:44:50+5:302024-02-09T17:56:40+5:30
मानुषी छिल्लरचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

मानुषी छिल्लर इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो शेअर करत असते. त्यातलेही तिचे लूक व्हायरल होत असतात.

नुकतंच मानुषी छिल्लरने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.

नुकतंच मानुषी छिल्लरने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.

गुलाबी रंगाची साडी, खास नेकलेस या वेशभूषेत मानुषीचं सौंदर्य खुललं आहे. तिचा हा खास आणि तितकाच स्पेशल लूक आहे.

मानुषीच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून अनेकांनी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर (manushi chhillar) ही तिच्या जबरदस्त आणि प्रतिभावान अभिनयासाठी ओळखली जाते.

बॉलिवूडमध्ये तिने स्वतःच अनोखं स्थान निर्माण करत आजवर अनेक अफलातून प्रोजेक्ट्स देखील केले.

2017 मध्ये मानुषीने मिस वर्ल्ड हा किताब जिंकला होता. मानुषी ही मेडिकल क्षेत्र सोडून मानुषी अभिनय क्षेत्रात आली. 2022 साली तिने 'खिलाडी' अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' मधून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. अक्षय कुमार असातानाही सिनेमा दणकून आपटला होता.

यानंतर ती विकी कौशलसोबत गेल्या वर्षीच आलेल्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' मध्ये दिसली.

आता ती आगामी दाक्षिणात्य प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. साऊथ स्टार वरुणसह ती 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' या तेलुगू सिनेमात झळकणार आहे.

















