Manoj Bajpayee: लक्झरी कार ते आलिशान घर! अभिनेत्याचं नेटवर्थ पाहून डोळे होतील पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 11:54 AM2023-04-23T11:54:39+5:302023-04-23T12:01:12+5:30

Manoj bajpayee:मनोज वाजपेयी यांच्या अंधेरीच्या घराची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

बॉलिवूडमध्ये नशीब आजमावं अशी प्रत्येक नवोदित कलाकाराची इच्छा असते. परंतु, हे स्वप्न साकार करायला बराच मोठा स्ट्रगल करावा लागतो. असाच स्ट्रगल अभिनेता मनोज वाजपेयी याने केला.

आपल्या दमदार अभिनयशैलीच्या जोरावर मनोज वाजपेयीने बॉलिवूडमध्ये जम बसवला. परंतु, त्याचा प्रवास सोपा नव्हता.

बिहारच्या बेलवा गावात मनोज वाजपेयीचा जन्म झाला. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्याने आज अमाप संपत्ती कमावली आहे. त्यामुळेच आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊयात.

नाटकांपासून अभिनयाची कारकिर्द सुरु करणारा हा अभिनेता बँडिट क्वीन १९९४ या सिनेमामुळे प्रकाशझोतात आला. या सिनेमात त्याने मान सिंहची भूमिका साकारली होती.

मनोज वाजपेयी यांना खरी ओळख मिळाली ती सत्या सिनेमातील भिकू म्हात्रे या भूमिकेमुळे. या सिनेमानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.

आज कलाविश्वात मनोज वाजपेयी यांचं नाव आदराने घेतलं जातं. मनोज वाजपेयी आज अमाप संपत्तीचे मालक आहेत.

२०२१ साली त्यांनी अंधेरीतील पॉश एरियामध्ये घर घेतलं. १९ व्या मजल्यावर त्यांचं घर असून येथे ते पत्नी आणि मुलीसोबत राहतात.

मनोज वाजपेयी यांच्या अंधेरीच्या घराची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

मनोज वाजपेयी यांना गाड्यांची विशेष आवड आहे. त्याच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये Mercedes-Benz GLS 400d 4MATIC,Land Cruiser Prado, BMW 5 Series,Toyota Fortuner and Mahindra Scorpio,Mahindra Scorpio या गाड्यांचा समावेश आहे.

मीडिया सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांचं एकूण नेटवर्थ ११८ कोटी रुपये इतकं आहे.