पहिल्याच सिनेमातून रातोरात स्टार बनली, पण एका चुकीने उद्ध्वस्त केलं मनीषा कोईरालाचं करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 11:35 AM2023-01-30T11:35:29+5:302023-01-30T11:46:14+5:30

Manisha Koirala : नशीबाने असं काही वळणं घेतलं की, करिअरच्या पहिल्या सिनेमाने रातोरात स्टार बनलेली मनीषा एक झटक्यात फ्लॉप हिरोईन झाली.

Manisha Koirala : एक वेळ होती जेव्हा बॉलिवूडमध्ये मनीषा कोईरालाने आपल्या अदांनी फॅन्सना वेड लावलं होतं. तिच्या कामाचं सगळीकडे कौतुक होत होतं. त्यावेळी तिने एकापाठी एक अनेक हिट सिनेमे दिले होते. पण नशीबाने असं काही वळणं घेतलं की, करिअरच्या पहिल्या सिनेमाने रातोरात स्टार बनलेली मनीषा एक झटक्यात फ्लॉप हिरोईन झाली.

मनीषा कोईरालाने आपल्या करिअरमध्ये केवळ हिंदीच नाही तर साऊथ आणि नेपाळी सिनेमांमध्येही काम केलं. सगळीकडे तिने तिचं नाव कमावलं. त्याशिवाय मनीषाने बंगाली आणि इंग्रजी सिनेमांमध्येही कामे केली. 1991 साली आलेल्या सौदागर सिनेमातून तिने तिच्या करिअरची सुरूवात केली होती. या सिनेमातून ती रातोरात स्टार बनली होती.

पहिल्याच सिनेमातून मिळालेल्या यशामुळे मनीषाला करिअर पुढे नेण्यास मदत मिळाली. त्यानंतर तिला अनेक सिनेमे ऑफर झाले. 1994 मध्ये आलेल्या 1942 अ लव्हस्टोरी सिनेमातील तिचं काम पाहून तर सगळेच अवाक् झाले होते. त्यानंतर ती क्रिमिनल, बॉम्बे, अकेले हम अकेले तुम, दुश्मनसारख्या सिनेमात दिसली.

2000 सालाआधी मनीषा लोकांच्या मनात घर करून होती. पण यानंतर अचानक तिचं करिअर थंडावलं. गुप्त, दिल से, कच्चे धागे, मन सारख्या हिट सिनेमांनंतर एक वेळ अशी आली की, लोकांनी तिला नाकारणं सुरू केलं. मग काय सगळं काही विसरून मनीषा नशेच्या आहारी गेली.

करिअरच्या पीकवर असताना मनीषा नशेच्या आहारी गेली. त्यामुळे तिच्या हातून अनेक मोठे सिनेमे निघून गेले. त्यानंतर जे सिनेमे केले ते लागोपाठ फ्लॉप झाले. त्यानंतर मनीषाला 2012 मध्ये कॅन्सर झाल्याचं समजलं.

मनीषाने चार वर्ष कॅन्सरवर उपचार घेतले. त्यानंतर तिने कॅन्सरला मात दिली. तिने एका नव्या आयुष्यात पाउल ठेवलं. आज मनीषा लोकांसाठी प्रेरणा बनली आहे. जर आत्मविश्वास असेल तर कॅन्सरला हरवलं जाऊ शकतं. कमबॅक केल्यावर तिचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मनीषाने एका इव्हेंट दरम्यान सांगितलं होतं की, कॅन्सरसारख्या आजारासोबत लढताना तिला जीवनाचा खरा अर्थ काय असतो हे समजलं. ती हे शिकली की, जीवन कसं जगलं जातं. इतकंच काय तिने कॅन्सर एक पुस्तकही लिहिलं होतं.

आपल्या आजाराला मात दिल्यानंतर मनीषा कमबॅक केलं आणि अखेरची ती संजय दत्तचा बायोपिक 'संजू' मध्ये दिसली होती. आधी राजघराण्यातून बॉलिवूडमध्ये येणं आणि नंतर लग्न व पुढे घटस्फोट, कॅन्सरसारखा जीवघेणा आजार आणि पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणं. बघायला केलं तर मनीषा कोईरालाचं आयुष्य एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही.

मनीषा कोईराला आता पुन्हा एकदा फिल्मी दुनियेत सक्रिय झाली आहे. अनेक सिनेमात ती दिसू लागली आहे. लवकरच ती कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’ मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.