मार्चमध्ये 'धुरंधर' अन् 'टॉक्झिक'ची हवा, एप्रिलमध्ये काय होणार? 'या' सिनेमांकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 18:28 IST2026-02-24T18:22:15+5:302026-02-24T18:28:21+5:30
सलमान खान ते अक्षय कुमार सगळेच स्टार रांगेत

मार्चमध्ये 'धुरंधर २'चं वादळ बॉक्स ऑफिसवर येणार आहे. १९ मार्च रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. त्याच दिवशी साउथ स्टार यशचा 'टॉक्झिक'ही प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान मार्चनंतर एप्रिल महिन्यात काय होणार? कोणकोणते सिनेमे येणार याची सिनेप्रेमींना उत्सुकता आहेच. याची संपूर्ण लिस्टच आता आली आहे.

अख्खा बॉलिवूड एक तरफ और इमरान हाशमी एक तरफ...अशा सर्वांच्या लाडक्या इमरान हाशमीचा सिनेा येतोय. 'आवारापन २' या त्याच्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ३ एप्रिल रोजी आवारापन २ रिलीज होणार आहे.

दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अक्षय कुमार ही जोडी म्हणजे हास्याची मेजवानी फिक्स असते. त्यांचा 'भूत बंगला' सिनेमा प्रदर्शनाच्या रांगेत आहे. १० एप्रिल रोजी हा सिनेमा येतोय. सिनेमात वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू, मिथिला पालकर, राजपाल यादव यांचीही भूमिका आहे.

मृणाल ठाकुरचा बहुप्रतिक्षित 'डकैत' सिनेमा १९ मार्चला येणार होता. मात्र त्या दिवशी दोन बिग बजेट सिनेमे असल्याने याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता हा सिनेमा १० एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान याच दिवशी भूत बंगलाही येत असल्याने दोन्हीचं क्लॅश होणार की कोणता सिनेमा डेट बदलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

एप्रिलमध्ये सलमान खानचा 'बॅटल ऑफ गलवान' रिलीज होण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. सलमानसाठी हा सिनेमा महत्वाचा आहे कारण त्याचे याआधीचे काही सिनेमे चांगलेच आपटले. अपूर्व लखिया यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

सुपरस्टार रामचरणचा 'पेद्दी' एप्रिल अखेर रिलीज होणार आहे. सिनेमा अभिनेत्री जान्हवी कपूरही मुख्य भूमिकेत आहे. हा तेलुगु सिनेमा आहे जो इतर भाषांमध्येही रिलीज केला जाईल.

















