नाद करा पण कियाराचा कुठं! ड्रेस आणि घड्याळची किंमत वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 19:41 IST2023-12-19T19:26:51+5:302023-12-19T19:41:45+5:30

जाणून घेऊयात कियाराच्या ग्लॅमरस लूकची किंमत...

कियारा अडवाणी ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे कायम चर्चेत असते.

नुकतेच कियारा अडवाणीने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ८’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिच्या खास लूकची चाहत्यांनी प्रशंसा केली आहे.

कियारा अडवाणीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या सुंदर लूकचे काही फोटो शेअर केले आहेत.

प्रत्येकजण तिच्या लुकबद्दल उत्सुक आहे. या लूकसाठी अभिनेत्रीने कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत.

ऑस्ट्रेलियन फॅशन डिझायनर अॅलेक्स पेरीने तयार केलेल्या हार्ट-नेक ब्लॅक मिडी ड्रेसची किंमत १.१६ लाख रुपये आहे.

यासोबतच कियाराने तिच्या मनगटावर स्टायलिश बल्गेरी घड्याळ घातले होते. रिपोर्टनुसार या घड्याळाची किंमत १.२२ कोटी रुपये आहे.

ऐवढेच नाही तर तिने परिधान केलेल्या लाल लेदर हिल्सची किंमत ७५ हजार रुपये आहे.

कियारा अडवाणी शेवटची सत्य प्रेम की कथा या चित्रपटात दिसली होती.