IN PICS : अश्विनी भावेला कसा मिळाला होता ‘हिना’? इंटरेस्टिंग आहे किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 08:00 AM2022-12-19T08:00:00+5:302022-12-19T08:00:02+5:30

‘हिना’ हा अश्विनी भावेचा पहिला हिंदी सिनेमा. हा सिनेमा तिला मिळण्यामागे एक कहाणी आहे...

बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात अनेक अभिनेत्री आल्या आणि बघता बघता लोकप्रिय झाल्यात. पण तेवढ्याच अनपेक्षितपणे ग्लॅमरच्या दुनियेतून गायब झाल्यात. अश्विनी भावे ही अशीच एक अभिनेत्री.

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारीअभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने अश्विनी भावे यांनी रसिकांवर मोहिनी घातली.

90 च्या दशकात अश्विनी भावेनं अनेक मोठ्या हिरोंसोबत काम केलं. अगदी अक्षय कुमारपासून ऋषी कपूरपर्यंत अनेकांसोबत तिने स्क्रिन शेअर केली. अभिनयासोबत लेखन, दिग्दर्शन, निर्माता अशा विविध जबाबदाऱ्या तिने पूर्ण केल्या.

काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोपर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाली आहे. अर्थात अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी आपलं मराठीपण कायम जपलं.

सलमान खान आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत ‘बंधन’ सिनेमाचं हैदराबादला शूटिंग सुरु होतं. या सिनेमाचं संपूर्ण शूटिंग हैदराबादला होतं. कामातून महिन्याची सुटी घेऊन घरी आलेले किशोर बोपर्डिकरर हे शूटिंग पाहण्यासाठी आले होते. किशोर बोपर्डीकर हे त्यावेळी अमेरिकेत एका कंपनीत कामाला होते.

यानिमित्ताने अश्विनी भावे व किशोर यांच्यात मैत्री झाली आणि नंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी 2007 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. किशोर बोपर्डीकर हे उद्योगपती आहेत. दोघांना आता दोन मुलं आहेत.

‘हिना’ हा अश्विनी भावेचा पहिला हिंदी सिनेमा. हा सिनेमा तिला मिळण्यामागे एक कहाणी आहे. अश्विनी ही प्रख्यात फोटोग्राफर दिवंगत गौतम राजाध्यक्ष यांच्याकडे चंदेरीसाठी फोटो काढण्यासाठी गेली होती. याच फोटोंनी तिला ‘हिना’ मिळवून दिला.

‘हिना’साठी हिरोईनचा शोध सुरू आहे. काही फोटो असतील तर पाठवून दे, असा रणधीर कपूर यांच्या फोन गौतम राजाध्यक्ष यांना आला. गौतम राजाध्यक्ष यांनी अश्विनीला तुझे फोटो पाठवू का म्हणून विचारलं आणि फोटो पाठवून दिले. यानंतर ‘हिना’साठीच्या स्क्रिनटेस्टसाठी अश्विनीला बोलवणं आलं.

खरं तर या स्क्रिनटेस्टआधीच अश्विनीचा ‘कळत नकळत’मधील अभिनय त्यांनी पाहिला होता. स्क्रिन टेस्टची औपचारिकात आटोपल्यानंतर अश्विनीची निवड ‘हिना’साठी करण्यात आली. अश्विनी भावे हिची आजही प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून इन्स्टाग्रामवर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.