Kirti Kulhari : "लग्नाने माझी शांतता हिरावून घेतली, मी माझं नातं वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण...";
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:17 IST2025-02-22T13:09:44+5:302025-02-22T13:17:05+5:30
Kirti Kulhari : किर्ती कुल्हारीने पाच वर्षांनंतर वेगळं होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

अभिनेत्री किर्ती कुल्हारीने साहिल सहगलसोबत लग्न केलं होतं आणि आता पाच वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
किर्तीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की, "मी माझं नातं वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यात यशस्वी झाली नाही आणि माझं लग्न तुटलं."
"माझ्या आयुष्यात साहिलची खूप मोठी भूमिका आहे. हे पण तितकंच खरं आहे की, लग्नाने माझी शांतता हिरावून घेतली होती."
"आम्ही वेगळं होण्याचा निर्णय पालकांना आवडला नाही. मी आमचं नातं वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं माझ्या आईला वाटत होतं."
"मी आधी एक आई होण्याचा आणि मुलाला जन्म देण्याचा विचार करायची पण आता असं अजिबात नाही."
किर्ती कुल्हारीसोबत कास्टिंग काऊचसारख्या घटना देखील घटना घडल्या आहेत पण तिला हा मोठा मुद्दा वाटत नाही.
अभिनेत्रीचे वडील ख्याली राम कुल्हारी हे भारतीय नौदलात कमांडर होते आणि आईचं नाव श्रावणी कुल्हारी आहे. तिला एक भाऊही आहे.
किर्तीने हिमेश रेशमियासोबत बॅडएस रवि कुमारमध्ये काम केलं आहे.