सारा, क्रितीनंतर कार्तिकच्या आयुष्यात आली नवी लेडी लव्ह, सीक्रेट डेटवर दिसलं कपल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 12:09 PM2023-10-23T12:09:59+5:302023-10-23T12:24:05+5:30

कार्तिकच्या आयुष्यात नव्या लेडी लव्हने एंट्री केली आहे.

कार्तिक आर्यनच्या सिनेमां इतकीच त्याच्या लव्हलाईफची देखील चर्चा होते. आतापर्यंत त्याचे नाव बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींशी जोडण्यात आले आहे. मात्र कार्तिकने त्याचं नातं कधीच स्वीकारलं नाही. यातील बऱ्याच त्याच्या को-स्टार होत्या.

'लव्ह आजकल २' च्या दरम्यान कार्तिकचे अफेअर सारा अली खानसोबत असल्याची चर्चा होती. दोघे अनेकवेळा एकत्रसुद्धा स्पॉट व्हायचे. पण हे नातं काही फारकाळ टिकलं नाही.

सारानंतर कार्तिकचं नाव क्रिती सॅननसोबत जोडलं गेलं होतं. शहजादा सिनेमा प्रमोशन दरम्यान ते रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जातं होते.

त्यानंतर कार्तिक आणि ह्रतिक रोशनची बहीण पश्मिना रोशन यांच्या अफेअरची चर्चा झाली. कार्तिक अनेकवेळा पश्मिनाच्या घराबाहेर दिसला.

आता कार्तिकच्या आयुष्यात नवी लेडी लव्ह आली आहे. कार्तिक आणि तारा सुतारिया एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांना एकत्र डिनर डेटवर स्पॉट झाले.

डिनर डेटनंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारुन गुडबाय म्हटलं. तसेच दोघे एकाच गाडीतून गेले. नेटकरी म्हणतायेत, सारानंतर कार्तिकच्या आयुष्यात आली तारा.

डिनर डेटनंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारुन गुडबाय म्हटलं. तसेच दोघे एकाच गाडीतून गेले. नेटकरी म्हणतायेत, सारानंतर कार्तिकच्या आयुष्यात आली तारा.

कार्तिक आणि तारा 'आशिकी ३'मध्ये एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चाहते या जोडीला रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी आतुर झालेत.

पुढच्या वर्षी जानेवरी महिन्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. मात्र या सिनेमाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.