Kareena Kapoor : जेहच्या जन्मानंतर करीनाचं वाढलं २५ किलो वजन; टेन्शनमध्ये आली बेबो, झाली इनसिक्युअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:37 IST2025-04-04T14:21:21+5:302025-04-04T14:37:57+5:30

Kareena Kapoor : करीनाने सांगितलं की, तिचा दुसरा मुलगा जहांगीरच्या जन्मावेळी तिचं वजन तब्बल २५ किलोने वाढलं होतं.

अभिनेत्री करीना कपूर दोन मुलांची आई आहे. करिना तिच्या प्रेग्नेंसी दरम्यान पूर्णपणे एक्टिव्ह राहिली. डिलिव्हरीनंतर तिने वजन लवकर कमी केलं.

करीना तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. दोन्ही प्रेग्नेंसीच्या वेळी ती एक सुपरफिट मॉम राहिली आहे. पण एक वेळ अशी आली जेव्हा तिला तिच्या वजनाबद्दल इनसिक्युअर वाटू लागलं.

करीनाने सांगितलं की, तिचा दुसरा मुलगा जहांगीरच्या जन्मावेळी तिचं वजन तब्बल २५ किलोने वाढलं होतं.

अभिनेत्रीची मैत्रीण आणि न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात करीनाने याबाबत खुलासा केला आहे.

या कार्यक्रमात अभिनेत्रीने तिच्या अन्नावरील प्रेमाबद्दल सांगितलं आहे. तिला जे हवं असतं ते ती खाते असं सांगितलं. स्वतःला नेहमी आनंदी ठेवते.

"जेहच्या जन्मानंतर एक क्षण असा आला. जेव्हा मला वाटलं अरे देवा, मला परत जावं लागेल. हे वजन पुन्हा कमी करावं लागेल."

"ही भावना फक्त काही एका सेकंदासाठी होती. यानंतर लगेचच मला वाटलं की, मी अजूनही खूप छान दिसत आहे. माझं वजन २५ किलोनी वाढलं होतं" असं अभिनेत्रीने म्हटलं.

करिना इंडस्ट्रीमध्ये एक ट्रेंडसेटर राहिली आहे. तिनेच झिरो फिगर ही कॉन्सेप्ट आणली होती. 'टशन' चित्रपटासाठी तिने वजन कमी केलं होतं.

करीना कपूर सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.