कंगनाने दिलजीतला पुन्हा छेडलं, म्हणाली - या लोकल क्रांतिकाऱ्याला पंजाबीत सांगा कुणीतरी...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 03:55 PM2020-12-11T15:55:20+5:302020-12-11T16:05:12+5:30

ट्विटमध्ये लिहिले होते की, शेतकऱ्यांना भटकवण्यासाठी प्रियांका आणि दिलजीतचं लेफ्ट मीडियाकडून कौतुक होईल. भारत विरोधी इंडस्ट्री त्याना ऑफर देतील. हा सिलसिला असाच चालत राहणार.

सोशल मीडियावर कंगना रणौत आणि दिलजीत दोसांज यांच्यातील ट्विटर वॉर संपण्याचं नावच घेत नाहीये. तसा दोघांच्यात सुरू झालेल्या वादा अनेक दिवस लोटले असले तरी दोघांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप काही थांबायचं नाव घेत नाहीयेत.

आता कंगनाने सोशल मीडियावर एक असं ट्विट केलं जे वाचून दिलजीतला राग येणं स्वाभाविक आहे. कारण कंगनाने पुन्हा त्याची खिल्ली उडवली आहे.

कंगनाने सोशल मीडियावर एका यूजरची पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये एका व्यक्तीने कथितपणे सोप्या शब्दात कृषी विधेयक समजावून सांगितलं आहे. त्याने हे दाखवलं की, अखेर मतेभद कोणत्या मुद्द्यांवर होत आहेत.

हीच पोस्ट शेअर करत कंगना रणौतने दिलजीतवर निशाणा साधला आहे. अभिनेत्रीने लिहिले की, पाजी तुमचे धन्यवाद. आता या लोकल क्रांतिकारी दिलजीतला सुद्धा कुणीतरी हे समजावून सांगा.

कंगना पुढे म्हणाली की, दिलजीत माझ्यावर तर फार नाराज झाला होता. तेव्हा मी समजावण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाचं हे ट्विट आता व्हायरल झालं आहे.

दरम्यान कंगनाने हे ट्विट गमतीदार अंदाजात केलं आहे. पण त्याआधी आणखी एक ट्विट करत तिने दिलजीत आणि प्रियांका चोप्रावर शेतकऱ्यांना भडकावण्याचा आरोप लावला होता.

ट्विटमध्ये लिहिले होते की, शेतकऱ्यांना भटकवण्यासाठी प्रियांका आणि दिलजीतचं लेफ्ट मीडियाकडून कौतुक होईल. भारत विरोधी इंडस्ट्री त्याना ऑफर देतील. हा सिलसिला असाच चालत राहणार.

दरम्यान जी कंगना आता दिलजीतला हे कृषी विधेयक पंजाबीमध्ये समवाजून सांगण्यास सांगत आहे. काही दिवसांपूर्वी दिलजीतचा असाच एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात त्याने कंगनाला टोला मारत म्हटले होते की, मी हिंदीत बोलत आहे जेणेकरून सर्वांना समजेल.