'कभी खुशी कभी गम'मधील 'लड्डू' आठवतोय? अभिनेत्याला आता ओळखूच शकणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 18:12 IST2025-10-17T17:45:34+5:302025-10-17T18:12:04+5:30
'कभी खुशी कभी गम' मधील लड्डू आठवतो? साकारलेलं हृतिकच्या बालपणाचं पात्र, आता ओळखूच शकणार नाही

चित्रपटसृष्टीत नशीब फार महत्वाचे आहे, असे म्हटले जाते. अनेक कलावंतांकडे प्रतिभा असतांनाही त्यांच्या हाती अपयश येतं. त्यामुळे चित्रपटसृष्टीत त्यांना फारसं यश मिळालं नाही.
साल २००१ मध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, जया बच्चन आणि हृतिक रोशन, काजोल करीना कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेला कभी खुशी कभी गम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
त्यावेळी या कौटुंबिक चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभियन सगळ्या गोष्टींना प्रेक्षकांची दाद मिळाली
कभी खुशी कभी गम चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास २४ वर्षांचा कालावधी उलटला आहे. या चित्रपटाप्रमाणे त्यातील बालकलाकारांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
अभिनेता कविश मजुमदारने या चित्रपटात हृतिक रोशनच्या बालपणाची भूमिका साकारली होती. त्याच्या कामाचं सगळ्यांनीच कौतुक केलं.
कभी खुशी कभी गम मधील हा लड्डू आता मोठा झाला आहे. इतक्या वर्षानंतर अभिनेत्याचा लूक पूर्णपणे बदलला आहे. त्याला चाहते ओळखूच शकणार नाहीत. सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर येतात.
‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटानंतर कविश वरुण धवन आणि इलियाना डिक्रूझ यांच्या ‘मैं तेरा हिरो’ या चित्रपटात दिसला. त्याचबरोबर ‘गोरी तेरे प्यार में’ या चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. कविशचं इंडस्ट्रीतील पदार्पण चर्चेचं ठरलं पण त्याला करिअरमध्ये पाहिजे तसं यश मिळालं नाही.