आईच्या निधनाचा फोन आल्यावर...; श्रीदेवीच्या मृत्यूबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी, म्हणाली - खुशीच्या रुममधून रडण्याचा आवाज ऐकून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 18:53 IST2024-01-04T18:50:05+5:302024-01-04T18:53:31+5:30
"खुशीच्या रुममधून रडण्याचा आवाज ऐकून...", श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अशी झालेली लेकीची अवस्था, जान्हवीचा खुलासा

जान्हवी कपूर आणि खुशी कपूरने आई श्रीदेवीच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयाची वाट धरली. जान्हवी बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर खुशीने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
२०१८ साली अचानक श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आकस्मिक निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. यातून त्यांच्या कुटुंबीयांनाही सावरणं कठीण होतं.
कॉफी विथ करणमध्ये जान्हवीने श्रीदेवीच्या मृत्यूबाबत भाष्य केलं. ती म्हणाली, "खुशी खूप धीट आहे. छोटी बहीण असूनही खुशीने आई गेल्यानंतर मला सांभाळलं."
आईच्या आठवणीत जान्हवी आणि खुशी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
पुढे ती म्हणाली, "जेव्हा मला आईच्या निधनाची बातमी समजली तेव्ही मी माझ्या रुममध्ये होते."
"मला खुशीच्या रुममधून रडण्याचा आवाज येत होता. मी तिच्या रुममध्ये जाऊन तिला पकडून रडेन, असं मला वाटलं होतं."
"पण, जेव्हा तिने मला पाहिलं. तिने तिचं रडणं थांबवलं. तेव्हापासून मी तिला रडताना पाहिलेलं नाही."
पुढे खुशी म्हणाली, "आई नसेल हे स्वीकारायला मला थोडा वेळ लागला. पण, माझ्याकडे बाबा आणि जान्हवी होते. त्यांनी मला मदत केली."