Photos: प्रचंड बोल्ड आहे जावेद जाफरीची लेक; फोटो पाहून व्हाल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 05:38 PM2022-05-16T17:38:33+5:302022-05-16T17:41:52+5:30

Alviaa jaaferi:अलावियाने अद्यापही कलाविश्वात पदार्पण केलं नाही. मात्र, तरीदेखील ती सौंदर्याच्या बाबतीत अनेक भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकत आहे.

उत्तम अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांची मन जिंकणारा अभिनेता म्हणजे जावेद जाफरी. खलनायकाची भूमिका असो वा विनोदी प्रत्येक भूमिका त्याने लिलया पार पाडली.

जावेद जाफरीचा गेल्या काही काळात कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, तो सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो.

सध्या सोशल मीडियावर जावेदच्या लेकीची म्हणजे अलाविया जाफरीची चर्चा रंगली आहे. अलाविया सोशल मीडियावर सक्रीय असून कायम तिचे बोल्ड वा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

विशेष म्हणजे 'धमाल 2' जावेदचा मुलगा मीजान झळकला होता. मात्र, या चित्रपटामुळेही त्याला जितकी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यापेक्षा कैकपटीने अलावियाला मिळत आहे.

अलाविया सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून ती कायम तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिचे फोटो हा नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतो.

अलावियाने अद्यापही कलाविश्वात पदार्पण केलं नाही. मात्र, तरीदेखील ती सौंदर्याच्या बाबतीत अनेक भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकत आहे.

अलावियाला फोटोशूटची विशेष आवड आहे. त्यामुळे तिने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतं.

सूत्रांच्या माहितीनुसार, अलाविया लवकरच कलाविश्वात पदार्पण करणार आहे.