देशासाठी करिअर सोडलं, पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC; 'या' बॉलिवूड चित्रपटांमध्ये केलंय काम, ओळखलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 17:00 IST2025-10-26T16:49:20+5:302025-10-26T17:00:25+5:30

गुन्हेगारांशी सामना करणारी डॅशिंग अधिकारी,पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC; 'या' बॉलिवूड चित्रपटांमध्ये केलाय अभिनय, तुम्हाला माहितीये?

मनोरंजनाच्या विश्वात स्टारडम आणि ग्लॅमर यांना सर्वाधिक महत्त्व दिलं जातं.

मात्र, या सिनेविश्वात असेही चेहरे असतात जे पडद्यावर आणि पडद्याबाहेरही तितक्याच जोमात झळकत असतात.

असंच एक नाव म्हणजे सिमाला प्रसाद. एकीकडे देशसेवा आणि दुसरीकडे अभिनयाची आवड जपणाऱ्या सिमला प्रसाद यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा क्रॅक करत त्यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला.

खरंतर चित्रपटांसाठी अभिनेत्री पोलीस पात्रासाठी विशेष प्रशिक्षण, मेहनत घेतात. हे आपण पाहिलंय. पण, अभिनेत्री सिमाला प्रसाद खऱ्या आयुष्यात प्रत्यक्षातच एक SP आहेत. सध्या त्या मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात त्या कार्यरत आहेत.

सिमाला प्रसाद यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९८० रोजी भोपाळमध्ये झाला. त्यांचे वडील भगीरथ प्रसाद हे देखील आयएएस अधिकारी होते. तर त्यांची आई लेखिका होत्या.एका उच्चशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या सिमला प्रसाद यांनी शिक्षण आणि कलेचा उत्तम समतोल साधला.

वर्दी परिधान करून गुन्हेगारांशी दोन हात करणाऱ्या सिमाला प्रसाद यांनी २०१६ मध्ये आलेल्या ‘अलिफ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही दाद मिळाली.

त्यानंतर २०१९ मध्ये ‘नक्काश’ या चित्रपटात त्या झळकल्या. यामध्ये त्यांनी कुमुद मिश्रा, शारिब हाशमी आणि राजेश शर्मा यांसारख्या कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली.