'पुष्पा-२', 'फायटर' की 'स्त्री-२'; २०२४ मध्ये बॉक्स ऑफिसवर 'या' सिनेमाच्या तिकिटांची झाली सर्वाधिक विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 15:36 IST2024-12-21T15:19:11+5:302024-12-21T15:36:49+5:30
२०२४ मध्ये 'या' चित्रपटांनी गाजवलं बॉक्स ऑफिस...

'बुक माय शो' द्वारे २०२४ मधील इंडियन बॉक्स ऑफिसचा इयर एंड रिपोर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामधून २०२४ मध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक तिकिटांची विक्री होणाऱ्या हिंदी सिनेमांची नावं समोर आली आहेत.
यंदा २०२४ मध्ये 'फाइटर', 'सिंघम अगेन', 'भुल भूलैय्या-३' यांसारखे सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले.
त्यातील काही चित्रपटांनी इंडियन बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली.
परंतु कमाईच्या बाबतीत अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा २ : द रूल' या सिनेमाने बाजी मारली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा -२' या सिनेमाला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळाली. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेपासून जवळपास १०.८ लाख तिकिटांची विक्री झाल्याचं सांगितलं जातंय.
दरम्यान, १ नोव्हेंबरचा दिवस हिंदी सिनेमांसाठी खास ठरला. बॉक्स ऑफिस या दिवशी अजय देवगणचा सिंघम अगेन आणि कार्तिक आर्यनचा 'भुलभूलैय्या-३' हे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले.
फक्त २४ तासांमध्ये या चित्रपटांची २.३ मिलीयन तिकिटे विकली गेली.