'ही' अभिनेत्री लग्नाआधीच झाली होती प्रेग्नंट, घाईघाईत उरकलं होतं लग्न; आता दुसऱ्यांदा होतेय आई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:06 IST2025-06-02T16:57:09+5:302025-06-02T17:06:22+5:30
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे.

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यातलंच एक नाव म्हणजे इलियाना डिक्रूज (Ileana D'cruz ).
इलियाना डिक्रूज ही लग्नाआधीच प्रेग्नंट राहिली होती. प्रेग्नंट होताच तिनं घाईघाईत लग्न उरकलं होतं.
इलियाना डिक्रूझने एप्रिल २०२३ मध्ये इन्स्टाग्रामवर ती प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले होतं. तेव्हा तिचं लग्न झालेलं नव्हतं.
त्यानंतर तिने मे मध्ये बॉयफ्रेंड मायकलसोबत गुपचूप लग्न केलं होतं. लग्नानंतर ऑगस्ट २०२३ तिनं बाळाला जन्म दिला होता.
लग्नानंतर आता इलियाना पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. अलिकडेच तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितलं होतं.
सध्या इलियाना आपला संपुर्ण वेळ कुटुंबाला देत आहे. बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याचा सध्या तिचा कोणताच प्लॉन नाही.
विशेष म्हणजे 'रेड'च्या पहिल्या भागात झळकल्यानं तिला 'रेड २'देखील ऑफर करण्यात आला होता. पण, तिने शूटिंगच्या वेळा निश्चित न करु शकल्यानं तिनं सिनेमा नाकारला होता.
इलियानाने तिच्या अभिनय कारकिर्दीला दक्षिण भारतीय चित्रपटांमधून सुरुवात केली. 'देवासू' हा तिचा पहिला चित्रपट होता, ज्यासाठी तिला दक्षिणेतील सर्वोत्कृष्ट नवोदित कलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
देवासूनंतर इलियानाने 'पोकरी', 'किक', 'जुलै' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. साऊथमध्ये यश मिळवल्यानंतर इलियाना डिक्रूझ बॉलिवूडकडे वळली. तिचा पहिला हिंदी चित्रपट 'बर्फी' हा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.