'छावा'साठी विकीची जबरदस्त मेहनत! घोडेस्वारी, लाठीकाठी अन् भरपूर व्यायाम; पैलवानांसारखा होता दिनक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 16:10 IST2025-02-09T15:43:58+5:302025-02-09T16:10:02+5:30

'छावा' सिनेमासाठी विकीने केलेली प्रचंड मेहनत आणि भूमिकेसाठी केलेली तयारी त्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळतेय (chhaava, vicky kaushal)

'छावा' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. विकी कौशलने 'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. 'छावा'साठी विकीने किती मेहनत केलीय हे त्याने नुकत्याच शेअर केलेले फोटो पाहून कळतं.

'छावा'साठी विकीने कसून व्यायाय केलाय. शूटिंगमधून जसा वेळ मिळेल तसा विकी भरपूर व्यायाम करुन शरीरयष्टीवर मेहनत करायचा

'छावा'च्या आधी विकीचं वजन साधारण ७५ किलो होतं. 'छावा'साठी विकीने २५-३० किलो वजन वाढवलेलं दिसतं.

'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकीला उत्कृष्ट अभिनय करायचा होताच शिवाय बाह्यरुपावरही मेहनत घ्यायची होती. विकी आणि त्याच्या फिटनेस प्रशिक्षकांनी त्याच्याकडून ही मेहनत करवून घेतली.

जीममध्ये भरपूर व्यायाम करताना विकीला थकवा येणं साहजिक आहे. परंतु 'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारायचं लक्ष्य त्याच्या डोळ्यांसमोर होतं.

याचा परिणाम विकीवर चांगलाच झालेला दिसला. विकीने प्रचंड अंगमेहनत घेऊन 'छावा'च्या तयारीत शरीरयष्टी चांगलीच कमावली.

याशिवाय 'छावा' सिनेमासाठी घोडेस्वारी आणि लाठीकाठीचं उत्तम ट्रेनिंग विकीने घेतली. सिनेमाच्या शूटिंगवेळेस सर्व गोष्टी बघताना खऱ्या वाटाव्यात यासाठी विकीने भरपूर मेहनत केली आहे

'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चं दिग्दर्शन केलंय.