Malaika Arora: मलायका अरोराचा लग्न झालेल्या पुरूषांना खास सल्ला, म्हणाली- "जर तुमची बायको..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 01:11 PM2023-01-10T13:11:39+5:302023-01-10T13:19:35+5:30

मलायका काही दिवसांपूर्वीच 'बेडरूम सीक्रेट्स'बद्दलही खुलेपणाने बोलली होती

Malaika Arora Secret tips to Married Men: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या चित्रपटातील भूमिका, आयटम साँग यामुळे चर्चेत असते. पण त्याहीपेक्षा जास्त ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

अलीकडेच, मलायकाने एक नवा चॅट शो सुरू केला असून त्यात ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बेधडकपणे अनेक खुलासे करताना दिसत आहे.

मलायका अरोरा हिने बराच काळ आधी अरबाज खानशी घटस्फोट घेतला. त्यानंतर ती सध्या वयाने बराच लहान असलेल्या अर्जून कपूरला डेट करत आहे. याचदरम्यान मलायका अरोरा हिने सर्व पतींना असा सल्ला दिला आहे की, तिचे हे वक्तव्य व्हायरल झाले आहे.

मलायका अरोरा हिने 'यंग इंडियन्स'च्या नॅशनल समिट ऑफ टेक प्राईज 2023 मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींवर आपली रोखठोक मतं मांडली. यावेळी मलायकाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही काही विधाने केली, त्यामुळे तिने लोकांचे लक्ष वेधून घेतले.

मलायका अरोराने अनेक वर्षांपूर्वी अरबाज खानला घटस्फोट दिला आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्री अर्जुन कपूरला डेट करत आहे. येत्या काही दिवसांत मलायका अर्जुन कपूरसोबत पार्टीत किंवा एखाद्या कार्यक्रमात दिसली तेव्हा दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग दिसून आले.

या कार्यक्रमात मलायका अरोरा मनमोकळेपणाने बोलली. या कार्यक्रमात ती म्हणाली- "मी माझ्या आयुष्यात योग्य माणसाला खूप महत्त्व देते. कारण मी एक सुसंस्कृत स्त्री आहे आणि मला योग्य व्यक्ती सापडली आहे."

यासोबतच मलायकाने या कार्यक्रमात सर्व पतींना एक अतिशय मोलाचा सल्ला दिला. तिचे हे विधान चांगलेच चर्चेत आले.

मलायका म्हणाली- "तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमच्या जीवनात पत्नीला खूप महत्त्व असते. एक आनंदी स्त्री आणि पत्नी तुम्हाला तुमच्या सभोवतालची परिस्थिती चांगली बनवण्यासाठी नेहमीच मदत करू शकते."

"मी सर्व विवाहित पुरुषांना सांगते की जर तुमची पत्नी रोज घरी तुमची वाट पाहत असेल, आणि तुम्हाला या गोष्टीची कल्पना असेल तर तुम्ही वेळेत घरी जायला हवं. तिला तुम्ही पूर्ण आदर द्यायला हवा. त्याने तुमचे वैवाहिक जीवन नक्कीच सुखी राहिल," असा विशेष सल्ला तिने दिला.