कोणाला वाटते भीती, तर कोणाला आवडत नाहीत रंग; बॉलिवूडच्या 'या' कलाकारांना आहे रंगपंचमीचं वावडं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 18:24 IST2023-03-03T18:18:09+5:302023-03-03T18:24:25+5:30
Holi 2023: एका दिग्गज सेलिब्रिटीच्या अंगावर अंडी फोडल्यामुळे त्याने होळी खेळणं बंद केलं.

रणबीर कपूर - बलम पिचकारी हे गाणं रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्यावर चित्रीत झालं होतं. मात्र, खऱ्या आयुष्यात रणबीरला रंग खेळायला आजिबात आवडत नाही. काही रिपोर्ट्स नुसार, रणबीरला रंगांची अॅलर्जी आहे.
करीना कपूर खान - बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिने आजोबा राज कपूर यांच्या निधनानंतर होळी खेळणं बंद केलं आहे. बॉलिवूडमधील सर्वात मोठी होळी राज कपूर आयोजित करायचे.
टाइगर श्रॉफ- टायगरला केमिकलयुक्त रंगांची भीती वाटते त्यामुळे तो रंगपंचमी खेळत नाही. तसंच रंगपंचमीमध्ये पाण्याचा अपव्यय होतो असंही त्याचं मत आहे.
रणवीर सिंग - रणवीर सिंगला ओसीडी आहे. त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी त्याला कुठेही रंग पडलेला दिसला की तो साफसफाई करायला लागतो. त्यामुळे तो होळीच्या दिवशी कुठेच बाहेर पडत नाही.
जॉन अब्राहम - एका मुलाखतीत जॉनने रंगपंचमी न खेळण्यामागचं कारण सांगितलं होतं. या दिवशी बरेच जण गैरफायदा घेतात त्यामुळे मी रंग खेळत नाही.
श्रुती हासन - अंगावर पाणी उडवलेलं श्रुतीला अजिबात आवडत नाही. तसंच तिची स्किन सेंसेटिव्ह असल्यामुळे तिच्या त्वचेवर लगेच डाग पडतात असंही तिने सांगितलं.
करण जोहर - लहान असताना करण जोहरच्या अंगावर कोणी तरी सडलेली अंडी फेकली होती. तेव्हापासून करण होळी खेळत नाही.