एका गाण्याने रातोरात बनली स्टार! असा आहे मराठमोळ्या मिथिला पालकरचा फिल्मी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 20:06 IST2024-01-11T19:46:14+5:302024-01-11T20:06:54+5:30

वेब विश्वात स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून मिथिला पालकरला ओळखले जाते.

मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरचा आज (११ जानेवारी) वाढदिवस आहे.

या खास दिवशी केवळ बॉलिवूडच नाही तर तिचे चाहतेही शुभेच्छा देत आहेत.

मिथिला पालकरचा जन्म ११ जानेवारी १९९३ रोजी मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला.

आपल्या अभिनयातून मिथिलाने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे.

मराठी, हिंदी सिनेमे आणि सीरिजमध्ये ती दिसली आहे.

मिथिलाने 2014 मध्ये मराठी लघुपट 'माझा हनीमून'मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ही शॉर्ट फिल्म मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्येही दाखवण्यात आली होती.

मराठी गाणे तुझी चाल तुरुतरु या 'कप सॉन्ग' च्या तिच्या स्वत:च्या व्हर्जनमुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली. या एका गाण्याने मिथिला पालकरला रातोरात स्टार बनवलं होतं.

मिथिलाच्या 'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटल थिंग्स' या दोन्ही वेबसीरीज लोकप्रिय आहेत. यात साकारलेल्या भुमिकेमुळे तिने अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे.

मिथिलाचा पहिला हिंदी चित्रपट 'कट्टी-बट्टी' होता. हा चित्रपट निखिल अडवाणीने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात मिथिलाने इम्रान खानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.

मिथिलाने इरफान खान आणि अभिनेता दुलकर सलमान यांच्यासोबत 'कारवां' सिनेमात एकत्र काम केलं होतं.

अभिनेत्री काजोलसोबत 'त्रिभंगा'मध्येही ती झळकली होती. या चित्रपटात मिथिलाने काजोलच्या मुलीची भूमिका साकारली होती.