20 वर्षांनंतर अशी दिसते 'मोहब्बतें'ची ही अभिनेत्री, १२ वर्षांआधी लग्न करून सोडली होती इंडस्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 01:42 PM2020-08-18T13:42:15+5:302020-08-18T13:52:28+5:30

'छुई मुई सी तुम लगती हो' आणि 'कुड़ी जंच गई' ही गाणी कमाल हिट ठरली होती. त्यानंतर प्रीती निरमा साबण आणि इतरही जाहिरातींमध्ये दिसली होती.

'मोहब्बते' सिनेमात जिमी शेरगिलसोबत दिसलेली अभिनेत्री प्रीती झांगियानी आज ४० वर्षांची झाली. १८ ऑगस्ट १९८० ला ती मुंबईतील एक सिंधी परिवारात जन्माला आली. प्रीतीने सर्वांचं लक्ष सर्वातआधी वेधून घेतलं ते राजश्री प्रॉडक्शनच्या 'ये है प्रेम' अल्बममधून.

यातील 'छुई मुई सी तुम लगती हो' आणि 'कुड़ी जंच गई' ही गाणी कमाल हिट ठरली होती. त्यानंतर प्रीती निरमा साबण आणि इतरही जाहिरातींमध्ये दिसली होती. पण सिनेमात फारसं यश मिळालं नसल्याने तिने संसार थाटण्याचा निर्णय घेतला.

प्रीतीने २३ मार्च २००८ ला मॉडल आणि अभिनेता प्रवीण डबाससोबत लग्न केलं. ११ एप्रिल २०११ ला प्रीतीने तिचा पहिला मुलगा जयवीरला जन्म दिला. साधारण पाच वर्षांनंतर प्रीती २७ सप्टेंबर २०१६ ला पुन्हा आई झाली. तिने पुन्हा एका मुलाला जन्म दिला.

प्रीती सध्या इंडस्ट्रीपासून दूर असून वांद्र्यात राहते आणि संसारात बिझी आहे. प्रवीणआधी प्रीतीने फिल्ममेकर फिरोज नाडियाडवालाचा भाऊ मुश्ताकसोबत साखरपुडा केला होतं. पण काही दिवसांनी त्यांचा साखरपुडा मोडला.

'आवारा पागल दिवाना' मध्ये सोबत काम केलेल्या आफताब शिवदसानीसोबत प्रीतीचं अफेअर असल्याची चर्चा झाली होती. पण नंतर तिने यात काहीही तथ्य नसून या केवळ अफवा असल्याचं सांगितलं होतं.

प्रीतीने सिनेमात १९९९ मध्ये आलेल्या 'मझाविल्लु' तून पाउल ठेवलं होतं. यात तिच्यासोबत अभिनेता कुंचाको बोवन दिसला होता. त्यानंतर ती 'थम्मुडु' या तेलुगू सिनेमात दिसली होती.

प्रीतीने २००० मध्ये आलेल्या 'मोहब्बतें' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर प्रीती २००२ मध्ये 'आवारा पागल दिवाना' आणि 'वाह तेरा क्या कहना' या सिनेमात दिसली होती.

नंतर प्रीती २००५ मध्ये आलेल्या 'चाहत:एक नशा' या सिनेमात अनेक बोल्ड आणि इंटीमेट सीन दिले होते. यात तिच्यासोबत अभिनेता आर्यन वैद्य होता. बोल्ड सीन्सचा भडीमार असूनही या सिनेमालं फारसं यश मिळालं नव्हतं.

प्रीतीने बाज, एलओसी कारगिल, आन, ओमकारासारख्या सिनेमात काम केलं होतं. प्रीतीने तिच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या भाषातील ३० पेक्षा जास्त सिनेमात काम केलं. यात हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, पंजाबी, उर्दू आणि बंगाली सिनेमांचा समावेश आहे.