परिणीती चोप्रापासून ते कियारा अडवाणीपर्यंत या अभिनेत्री साजरा करणार पहिला करवा चौथ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 01:21 PM2023-10-31T13:21:38+5:302023-10-31T13:48:31+5:30

यंदाच्या वर्षी अनेक बॉलिवूड अभिनेत्री पहिल्यांदाच करवा चौथ हा सण साजरा करणार आहेत. तर पाहूयात कोण कोण अभिनेत्रींचा यामध्ये समावेश आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणीनेही या वर्षी फेब्रुवारीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न केले. लग्नानंतर कियारा उद्या पहिल्यांदाच करवा चौथचा सण साजरा करणार आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्राने यावर्षी सप्टेंबरमध्ये आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्याशी लग्न केले. परिणीती तिच्या पहिल्या करवा चौथबद्दल खूप उत्सुक आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीने यावर्षी जानेवारीत क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न केले. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर अथिया शेट्टीचा हा पहिलाच करवा चौथ आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानीने गेल्या वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये सोहेल कथुरियासोबत लग्न केले. लग्नानंतर ती पहिल्यांदाच करवा चौथचा उपवास करणार आहे. यासाठी खूप उत्साही आहे.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि राजकीय नेते फहाद अहमद यांचा विवाह यावर्षी फेब्रुवारीमध्ये झाला. लग्नानंतर स्वराचा हा पहिलाच करवा चौथ असेल. सोबतच स्वरा आणि फहाद अहमद यांच्या घरी एक छोटा पाहुणाही आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय ही गेल्या फेब्रुवारीमध्ये चित्रपट निर्माता अभिषेक पाठकसोबत विवाहबद्ध झाली. शिवालिका पहिल्यांदाच करवा चौथ साजरा करणार असून तिही खूप आनंदी आहे.

आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री सोनाली सहगलनेही याच वर्षी जूनमध्ये लग्न केले. तिने आशिष सजनानी यास आपला जोडीदार बनवले आहे. आशिष सजनानी हा बिझनेसमन असून दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर तिचा हा पहिला करवा चौथ आहे.