PICS: आलिया भट्ट ते इमरान हाश्मी! हे सेलेब्स आहेत खऱ्या आयुष्यात एकमेकांचे नातेवाईक, नाव वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 02:47 PM2022-02-09T14:47:21+5:302022-02-09T19:01:31+5:30

मनोरंजन विश्वात असे अनेक दिग्गज अभिनेते आहेत, ज्यांचे कौटुंबिक नाते आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, श्रद्धा कपूर आणि लता मंगेशकर, रणवीर सिंग आणि सोनम कपूर हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. आज आम्ही तुम्हाला हिंदी चित्रपटसृष्टीतील कोण कोणाचे नातेवाईक आहे ते सांगणार आहोत.

श्रद्धा कपूरचे आजोबा पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे लता मंगेशकर यांचे पहिले चुलत भाऊ होते. श्रध्दाने तिच्या इंस्टाग्रामवर दोघांचे फोटो शेअर करून भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. (Photo instagram)

रणवीर सिंगचे आजोबा हे सोनम कपूरच्या आजीचे भाऊ आहेत. याच नात्यामुळे रणवीर सिंग हा सोनम कपूरचा चुलत भाऊ आहे. (Photo Instagram

अजिताभ बच्चन यांची मुलगी आणि अमिताभ बच्चन यांची भाची नयना बच्चन हिचे लग्न अभिनेता कुणाल कपूरसोबत झाले आहे. त्यामुळे कुणाल कपूर अमिताभ बच्चन यांचा जावई झाला आहे. (Photo Instagram)

इम्रान हा महेश भट यांच्या मावशीचा नातू आहे. म्हणून, अभिनेता महेश भट यांचा पुतण्या आणि आलिया भट-पूजा भटचा चुलत भाऊ आहे.(Photo Instagram)

बॉलिवूडचे दोन लोकप्रिय दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि करण जोहर खऱ्या आयुष्यात चुलत भाऊ आहेत. करण जोहरची आई हिरू जोहर दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांची बहीण आहे.(Photo Instagram)