रणवीर सिंग, अक्षय खन्ना की संजय दत्त! संपत्तीच्या बाबतीत खरा 'धुरंधर' कोण? जाणून घ्या नेटवर्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 16:42 IST2025-12-19T16:29:54+5:302025-12-19T16:42:16+5:30
आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर सिनेमाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.

कंदहार विमान अपहरण, २६/११ मुंबई हल्ला तसेच भारतीय संसदेवरी हल्ला या सगळा घटनाक्रम दाखवण्यात आला आहे.

या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

धुरंधरमधील प्रत्येक कलाकाराच्या कामाचं समीक्षकांसह प्रेक्षक देखील भरभरून कौतुक करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, प्रत्येकजण कलाकारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान, त्यांच्या संपत्तीबाबत सुद्धा चर्चा होताना दिसतेय.

रणवीर सिंग
'बॅंड बाजा बारात' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करत रणवीरने इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं. त्याने आजवर 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी' आणि 'सिम्बा'सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रणवीरची एकूण संपत्ती ४०० कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जातं. न्यूज18 च्या वृत्तानुसार, अभिनेता एका चित्रपटासाठी ३० ते ५० कोटी रुपये मानधन घेतो.

अक्षय खन्ना
धुरंधर मध्ये रेहमान डकैतचं पात्र साकारून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अक्षय खन्ना कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. हिमालय पुत्र या चित्रपटातून त्याने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. अक्षय खन्नाने त्याच्या कारकिर्दीत 'हमराज', 'दिल चाहता है',' दृश्यम 2', 'हंगामा' आणि 'हलचल' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती ₹167 कोटी आहे.


संजय दत्त
संजय दत्तने १९८१ मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली आणि तो गेली अनेक वर्षे तो या इंडस्ट्रीत सक्रिय आहे. संजय दत्तची एकूण संपत्ती २९५ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.

अर्जुन रामपाल
अभिनेता अर्जुन रामपाल या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.अर्जुन रामपाल सध्या धुरंधर चित्रपटामधून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आला आहे. त्यामुळे चित्रपटातील त्याच्या कामासाठी त्याचं कौतुक होत आहे. अर्जुन रामपालच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर मिडिया रिपोर्टनुसार अभिनेता १००-१२० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

आदित्य धर
संपूर्ण जगभरात धुरंधरची क्रेझ निर्माण करणारा दिग्दर्शक आदित्य धर हे इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. वृत्तांनुसार, त्याची आणि पत्नी यामीची एकत्रित एकूण संपत्ती १०० कोटी रुपये आहे.

















