Fatima Sana Shaikh : "वाईट वागणूक, अपमान, पैसे देत नाहीत"; 'दंगल' फेम अभिनेत्रीने केली टीव्ही इंडस्ट्रीची पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:52 IST2025-01-29T15:45:23+5:302025-01-29T15:52:40+5:30
Fatima Sana Shaikh : बॉलीवूड बबलशी झालेल्या संभाषणात अभिनेत्रीला विचारण्यात आलं की, टीव्हीवर काम करताना तुम्हाला काय त्रास होत होता?

'दंगल' फेम अभिनेत्री फातिमा सना शेखने टीव्ही इंडस्ट्रीबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.
फातिमा सना शेखने एका मुलाखतीत सांगितलं की, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये साइड एक्टर्सना वाईट वागणूक दिली जाते. अपमान करतात. त्यांच्यासोबत चुकीचं वागलं जातं.
बॉलीवूड बबलशी झालेल्या संभाषणात अभिनेत्रीला विचारण्यात आलं की, टीव्हीवर काम करताना तुम्हाला काय त्रास होत होता?
यावर ती म्हणाली, "जर तुम्ही मुख्य कलाकार नसाल तर टीव्ही शोमधील छोट्या भूमिका असलेल्या साइड कॅरेक्टरना आदर मिळत नाही."
"टीव्हीचं शूट सुरू झाल्यानंतर, पहिले पैसे ३ किंवा ४ महिन्यांनी मिळतात. दररोज सेटवर जाऊन हजेरी लावावी लागते आणि मी आली आहे हे सांगावं लागतं. तुम्हाला सही करावी लागते."
"जर तुम्ही सेटवर गेला असाल पण अटेंडन्स रजिस्टरमध्ये सही करायला विसरलात तर प्रॉडक्शनचे लोक ते स्वीकारणार नाहीत. ही खूप चुकीची गोष्ट आहे."
"मला तेव्हा दिवसाला १००० किंवा १५०० रुपये मिळायचे, जे तेव्हा खूप होते. पण अटेंडन्स नसेल तर ते पैसे कापले जायचे."
फातिमा सना शेखने २००२ मध्ये तिचा टीव्हीवरचा प्रवास सुरू केला. ती 'किट्टी पार्टी' मध्ये दिसली होती. यानंतर तिने 'लेडीज स्पेशल', 'अगले जनम मोहे बिटिया ही किजो' सारखे शो देखील केले आहेत.
फातिमाने अनेक चित्रपटांमध्येही काम केले. पण तिला अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली ती आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटातून.
फातिमा सना शेख लवकरच 'मेट्रो...इन दिनो' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २००७ च्या हिट चित्रपट 'लाइफ इन ए...मेट्रो' चा सिक्वेल आहे.