डॉक्टरकी सोडून अभिनयाकडे वळला! 'लालबाग परळ'मध्ये झळकला अन् 'छावा' गाजवला, ओळखलंत या अभिनेत्याला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 17:19 IST2025-02-14T16:46:39+5:302025-02-14T17:19:07+5:30

'लालबाग परळ' या मराठी सिनेमात झळकलेला हा अभिनेता 'छावा' सिनेमात एका खास भूमिकेत झळकत आहे. ही भूमिका चांगलीच गाजतेय (chhaava movie)

सध्या 'छावा' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. आज १४ फेब्रुवारीला 'छावा' सिनेमा जगभरातील थिएटर्समध्ये रिलीज झालाय

'छावा'मध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. विकीसोबत सिनेमातील आणखी एका अभिनेत्याची चर्चा आहे.

तुम्हाला मराठीतील 'लालबाग परळ' सिनेमा आठवत असेलच. या सिनेमात मोहनच्या भूमिकेत झळकलेला अभिनेत्याचं 'छावा'मधील भूमिकेमुळे कौतुक होतंय.

या अभिनेत्याचं नाव आहे विनीत कुमार सिंग. 'छावा' सिनेमात विनीतने छंदोगामात्य कवी कलश यांची भूमिका साकारली आहे. ही भूमिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरली आहे.

'छावा' गाजवणारा विनीत कुमार सिंग हा अभिनेता गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'गँग्ज ऑफ वासेपूर २', 'मुक्काबाज' अशा सिनेमांमधून विनीत कुमार झळकला.

विनीत कुमार सिंगच्या पत्नीचं नाव रुचिरा आहे. रुचिरा सुद्धा अभिनेत्री आहे. रुचिराने 'ह्यूमन' आणि 'she 2' यांसारख्या वेबसीरिजमध्ये काम केलंय

विनीत कुमार सिंगबद्दल सांगायचं तर तो 'छावा'नंतर तो आपल्याला 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव' या सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे. बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेता म्हणून विनीतची ओळख आहे.