Chhaava: पैसा वसूल! 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर मोठी डरकाळी, ४ दिवसांतच बक्कळ कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 10:11 IST2025-02-18T09:55:37+5:302025-02-18T10:11:25+5:30
Chhaava Box Office Collection: भल्याभल्यांना जमलं नाही ते 'छावा'ने करून दाखवलं, ४ दिवसांतच बक्कळ कमाई

छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
विकी कौशलने 'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्याचं सर्वत्र कौतुकही होत आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो 'छावा' रिलीज होताच प्रेक्षकांनी सर्व शो हाऊसफूल केले आहेत.
'छावा' सिनेमाने ४ दिवसांतच १३० कोटींचं बजेट वसूल केलं आहे. या सिनेमाचं चार दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
या सिनेमाने पहिल्याच दिवशी ३१ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३७ कोटींची कमाई केली.
'छावा' सिनेमाने पहिल्या रविवारी ४८.५ कोटींची कमाई करत पहिल्या वीकेंडला ८५.५ कोटींचा गल्ला जमवला.
विकी कौशलचा 'छावा' मंडे टेस्टमध्येही पास झाला आहे. या सिनेमाने सोमवारी जवळपास २४ कोटींचा बिजनेस केला आहे.
आत्तापर्यंत 'छावा' ने देशात बॉक्स ऑफिसवर तब्बल १४०.५० कोटी कमावले आहेत.
तर जगभरात १६४.७५ कोटींचा गल्ला जमवला आहे. 'छावा' ने चारच दिवसांत सिनेमाचं बजेट वसूल केलं आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळत आहे.