सौंदर्य अन् फॅशन लाजवाब! 'बॉर्डर २' मध्ये झळकलेली वरुण धवनची नायिका कोण? खऱ्या आयुष्यात दिसते फारच सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:22 IST2026-01-24T14:12:03+5:302026-01-24T14:22:57+5:30
'बॉर्डर २'मधील वरुण धवनची ऑनस्क्रिन पत्नी! खऱ्या आयुष्यात दिसते इतकी सुंदर,अभिनेत्री ओटीटीवरही हिट

२०२६ मधील बहुप्रतिक्षित चित्रपट 'बॉर्डर २'काल २३ जानेवारीच्या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ३० कोटींपेक्षा अधिक कमाई करत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खातं उघडलं आहे. सध्या सर्वत्र बॉर्डर-२ बद्दलच बोललं जात आहे.

भारत-पाक युद्धावर आधारित या चित्रपटात सनी देओसह वरुण धवन, दिलजीत दोसांझ और अहान शेट्टी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. मुख्य नायिका म्हणून मोना सिंग, सोनम बाजवा, मेधा राणा आणि अन्या सिंग हे चेहरे पाहायला मिळतायत.

सध्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून वाहवाह मिळते आहे. या चित्रपटात वरुण धवनच्या ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका अभिनेत्री मेधा राणाने साकारलेली आहे.

मेजर होशियार सिंह दहिया यांच्या पत्नीची भूमिका मेधाने चित्रपटात वठवली आहे. तिच्या भूमिकेला तिने योग्य न्याय दिला आहे. या चित्रपटामुळे मेधा प्रचंड चर्चेत आली आहे.तिच्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.

अभिनेत्री मेधा राणाचा जन्म २५ डिसेंबर १९९९ साली झाला आहे. तिचे वडील सुनील राणा हे सरकारी कर्मचारी आहेत. तर आई रितू राणा या एका स्किल्स अकॅडमीची सह-संस्थापिका म्हणून काम पाहतात.

मेधाने तिचं शालेय शिक्षण चंदीगढच्या कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर तिने पुढील शिक्षण बेंगळुरूच्या आर्मी पब्लिक स्कूलमधून पूर्ण केलं.

'बॉर्डर २'मधून प्रसिद्धी मिळवणाऱ्या मेधा राणाने २०२२ मध्ये 'लंडन फाइल्स'या वेब सिरीजमधून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. यात तिने अभिनेता अर्जुन रामपालसोबत स्क्रिन शेअर केली होती. शिवाय नेटफ्लिक्सच्या 'फ्राइडे नाइट प्लान' या सीरिजमध्येही ती झळकली आहे. मेधान या आधी जाहिरातींमधूनही काम केलं आहे.

मेधा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर या अभिनेत्रीचे २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. दरम्यान,चित्रपटात दिसणारी साधी मीरा खऱ्या आयुष्यात फारच सुंदर दिसते.

















