'मला यात ओढू नका'; विकी- कतरिनाच्या लग्नावर एक्स गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 04:11 PM2021-11-11T16:11:20+5:302021-11-11T16:15:22+5:30

Harleen sethi: विकीच्या लग्नाची चर्चा रंगल्यापासून त्याची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीदेखील चर्चेत आली आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ ही जोडी लवकरच लग्न करणार असल्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

२०२१ च्या अखेरीस ही जोडी राजस्थानमधील एका मोठ्या पॅलेसमध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सोशल मीडियावर विकी- कतरिनाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असतानाच अद्यापतरी या दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींकडून या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

विकीच्या लग्नाची चर्चा रंगल्यापासून त्याची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीदेखील चर्चेत आली आहे. प्रत्येकालाच या लग्नावर तिची प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

हरलीनने कोणत्याही प्रसारमाध्यमांसमोर थेटपणे तिची प्रतिक्रिया जरी दिली नसली तरीदेखील तिने तिच्या मित्र-परिवारात तिची प्रतिक्रिया दिली आहे.

हरलीनच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, हरलीन तिच्या आयुष्यात पुढे मार्गस्थ झाली असून तिला जुन्या गोष्टींमध्ये अजिबात रमायचं नाही.

हरलीनच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, हरलीन तिच्या आयुष्यात पुढे मार्गस्थ झाली असून तिला जुन्या गोष्टींमध्ये अजिबात रमायचं नाही.

"विकी कोणाशी लग्न करतोय यात मला काडीमात्र रस नाही. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चांमध्ये मला ओढू नका", असं तिने तिच्या मित्रपरिवारात सांगितलं आहे.

हरलीन सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून लवकरच ती एकता कपूरच्या 'द टेस्टट केस 2' मध्ये झळकणार आहे.

Read in English