बॉलिवूड सुपरस्टार घरातील भांडी घासतो, झाडू मारतो, तुम्ही ओळखलं का तो कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 18:06 IST2025-02-12T17:59:45+5:302025-02-12T18:06:05+5:30

लग्न झाल्यानंतर सर्वांचे आयुष्य बदलून जाते. याला सेलिब्रिटीही अपवाद नसतात. पण, एकमेंकाना समजून घेत, कुठलाही भेदभाव न करता जबाबदारी सांभाळत संसाराचा गाडा हाकला जातो. अनेक भारतीय पुरुष घरच्या कामात पत्नीला मदत करतात. असाच एक अभिनेता आहे जो आपल्या पत्नीला घरकामात मदत करतो.
तो अभिनेता आहे राजकुमार राव (Rajkummar Rao) . अभिनेता पत्नी पत्रलेखाला (Patralekhaa) दैनंदिन कामांमध्ये, जसं स्वयंपाक करणे, कपडे आणि भांडी धुण्यात मदत करतो.
राजकुमार राव आणि पत्रलेखा हे सिनेइंडस्ट्रीतल्या लोकप्रिय सेलिब्रिटी कपल पैकी एक आहेत.
एका मुलाखतीत राजकुमार रावने लग्नानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाले? याबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला, "आमच्या नात्यात समानता ही अगदी साध्या कामांपासून सुरू होते. पत्रलेखा स्वयंपाक करते तेव्हा भांडी धुणे धुतो. जर ती बाहेर गेलेली असेल तर घरातील कामे करणे मला आवडतं".
पत्रलेखा म्हणाली, "आमच्या नात्यात कोणत्याही पदानुक्रम नाही. समानता आणि परस्पर आदर यावर लक्ष केंद्रित केलं जातं".
ती म्हणाली, "राजकुमार हा खूप चांगला सेट झाला आहे. त्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टी कुठे ठेवल्या आहेत, हेही माहीत आहे. मला स्वयंपाक करायला खूप आवडते आणि राजकुमार हा नेहमीच भांडी स्वच्छ करून मला मदत करतो".
राजकुमार आणि पत्रलेखा यांनी एका दशकाहून अधिक काळ एकमेकांना डेट केलं होतं. अनेक वर्षांच्या मैत्रीनंतर त्यांनी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी लग्न केलं.
लग्नानंतर दोघांचंही आयुष्य बदललं. पण, एकमेंकाना सांभाळत त्यांचा संसार सुरू आहे.
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता अलिकडेच तृप्ती डीमरीसोबत 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तर त्याआधी तो श्रद्धा कपूरसोबत 'स्त्री २'मध्येही झळकला होता.
तर पत्रलेखा ही प्रतीक गांधी याच्यासोबत 'फुले' या हिंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे. यात ती सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.