९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री, जिच्या भानगडीत दाऊदने प्रोड्यूसरला झाडल्या गोळ्या, कोण होती ती?
By देवेंद्र जाधव | Updated: August 4, 2025 13:40 IST2025-08-04T13:25:42+5:302025-08-04T13:40:44+5:30
अभिनेत्रीचा थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध आला. त्यामुळे तिला बॉलिवूडमधून हद्दपार करण्यात आलं. सध्या ही अभिनेत्री एकांतवासात आहे

१९९०च्या दशकात बॉलीवूडमध्ये एक अभिनेत्री आली होती जी अल्पावधीत खूप लोकप्रिय झाली. ही अभिनेत्री म्हणजे अनीता अयूब
अनिता मूळची पाकिस्तानची आहे. तिने बॉलीवूडमध्ये देव आनंद यांच्या 'प्यार का तराना' (१९९३) या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.
अनीता दिसायला सुंदर होती आणि अभिनयही चांगला करत होती, त्यामुळे तिला पुढे अनेक चित्रपटांची ऑफर मिळाली.पण तिच्या करिअरपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती अधिक चर्चेत राहिली.
त्या काळात अनिताचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत जोडलं गेलं. दोघांचे संबंध असल्याच्या चर्चा जोरात होत्या.
अनेक मीडिया रिपोर्टनुसार एका निर्मात्याने अनिताला त्याच्या चित्रपटात घेतलं नाही म्हणून त्याची गोळ्या घालून हत्या झाली, आणि त्यामागे दाऊदचा हात असल्याचा संशय होता.
या प्रकरणानंतर अनीता अयूबवर अनेक आरोप झाले. त्यानंतर अनीता अयूबवर भारतासाठी पाकिस्तानमध्ये जासूसी करत असल्याचाही आरोप झाला.
या सर्व वादांमुळे तिला चित्रपटसृष्टीतून बाहेर काढण्यात आलं आणि तिचं करिअर लवकरच संपुष्टात आलं. नंतर अनीता अयूबने भारतीय उद्योजक सौमिल पटेल याच्याशी लग्न केलं आणि काही काळ न्यूयॉर्कमध्ये राहिली.
त्यानंतर घटस्फोटानंतर तिने दुसरं लग्न पाकिस्तानी व्यापारी सुबक मजीद याच्याशी केलं. सध्या ती सर्वच ग्लॅमरपासून दूर साधं जीवन जगत असून एकांतवासात असल्याची चर्चा आहे..