'हे' ९ बॉलिवूड स्टार सरकारकडूनही घेतात पगार, तर काहींना मिळतेय पेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:17 IST2025-08-06T14:08:45+5:302025-08-06T14:17:45+5:30
'या' बॉलिवूड स्टार्सबद्दल जाणून घेऊया...

बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी केवळ अभिनयाच्या जोरावर नव्हे, तर राजकारणात उतरूनही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. काही जण आजही सरकारी पदांवर कार्यरत आहेत. तर काहींना त्यांच्या सेवेबद्दल सरकारकडून पगार किंवा आयुष्यभरासाठी पेन्शन मिळतेय. अशा सेलिब्रिटीबद्दल आपण जाणून घेऊयात.
बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी (Hema Malini) अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम राजकारणी आहेत. त्या मथुरा येथून भाजपच्या लोकसभा खासदार आहेत. त्यांना सरकारकडून पगार आणि अनेक प्रकारचे भत्ते मिळतात.
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर (Kirron Kher) या चंदीगड येथून भाजपच्या लोकसभा खासदार आहेत. त्या सध्या लोकसभा खासदार म्हणून सरकारकडून पगार घेत आहेत आणि त्याव्यतिरिक्त त्यांना अनेक भत्ते देखील मिळतात.
बॉलिवूडचे 'शॉटगन' म्हणजेच शत्रुघ्न सिन्हा हे माजी खासदार (भाजप/टीएमसी) राहिले आहेत. खासदार असताना त्यांना पगार मिळत होता. आता शत्रुघ्न सिन्हा पेन्शनचा लाभ घेत आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन (Jaya Bachchan) सध्या समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांना राज्यसभेतूनही पगार आणि भत्ते मिळतात
रवी किशन (Ravi Kishan) हे केवळ भोजपुरी सुपरस्टार नाही तर तर ते आता बॉलिवूडवरही राज्य करत आहे. अलिकडेच अजय देवगणसोबत अभिनेत्याचा 'सन ऑफ सरदार २' प्रदर्शित झाला. चित्रपटातील रवी किशनच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. अभिनयाव्यतिरिक्त, रवी किशन हे राजकारणातही सक्रीय आहेत. ते गोरखपूरचे भाजपचे लोकसभा खासदार आहेत. त्यांना सध्या सरकारकडून पगार आणि भत्ते मिळतो.
टीव्हीवर 'रामायण'मध्ये सीतेची भूमिका साकारून दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) यांनी सर्वांचे मन जिंकलं. आजही लोक त्यांची पूजा सीतेसारखी करतात. दीपिका या माजी भाजप खासदार आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांना पगार मिळत असे. आता त्यांना पेन्शन मिळते.
बॉलिवूड क्वीन कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपची लोकसभा खासदार आहे. कंगना राणौतला सरकारकडून पगारही मिळतो. यासोबतच तिला इतर भत्तेही दिले जातात.
बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा (Rekha) यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत आणि ती अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. रेखा या माजी राज्यसभा खासदार (नामांकित) आहेत. राज्यसभा खासदार असताना त्यांना सरकारकडून पगार मिळत होता, तर आता त्या सरकारी पेन्शनचा लाभ घेत आहेत.
अभिनेता सनी देओल (Sunny Deol) त्याच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावतो. अलीकडेच, अभिनेत्याचा 'जाट' चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. सनी राजकारणातही सक्रीय होता. तो गुरुदासपूरचा भाजपचा माजी लोकसभा खासदार आहे. त्याच्या कार्यकाळात त्याला पगार मिळत होता आणि आता तो पेन्शन मिळण्यास पात्र आहे.