सोशल मीडिया पोस्टमधून सेलिब्रिटी कमावतात कोटयावधी रुपये; एका पोस्टसाठी घेतात इतकी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 12:08 PM2023-11-17T12:08:51+5:302023-11-17T12:17:36+5:30

Bollywood: कलाकार एका सोशल मीडिया पोस्टसाठी कोटीच्या कोटी रुपये फी आकारतात. या कलाकारांची फी ऐकून डोळे नक्कीच पांढरे होतील.

आलिया भट्ट - अलिकडेच आलिया ब्रह्मास्त्र या सिनेमात झळकली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. आलिया सध्या तिच्या लेकीमुळे राहामुळे चर्चेत येत आहेत.

आलिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार, प्रचंड फॅनफॉलोअर्स असलेली आलिया एका पेड पार्टनरशीपच्या पोस्टसाठी १ ते ३ कोटी रुपये चार्ज करते.

प्रियांका चोप्रा - बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

प्रियांका एका सोशल मीडिया पोस्टसाठी २ ते ४ कोटी रुपये मानधन घेते.

रणवीर सिंह - प्रचंड एनर्जी आणि मस्तीखोर स्वभाव यामुळे कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे रणवीर सिंह.

रणवीरचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावर सक्रीय असतो. रणवीर एका पोस्टसाठी ३ ते ५ कोटी रुपये घेतो.

अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या उत्तम अभिनयशैली आणि कूल पर्सनालिटीमुळे कायम चर्चेत येत असते.

सध्या दिपिका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेली दिपिका एका सोशल मीडियासाठी ७ ते १० कोटी रुपये मानधन घेते.