आलिया भट, दीपिका पादुकोण की श्रद्धा कपूर... २०२४ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 18:23 IST2024-12-20T17:47:26+5:302024-12-20T18:23:09+5:30
बॉलिवूडमधील कोणत्या सौंदर्यवतीने यावर्षी सर्वाधिक मानधन घेतलं आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

२०२४ हे वर्ष लवकरच संपणार आहे. याच दरम्यान बॉलिवूडमधील कोणत्या सौंदर्यवतीने यावर्षी सर्वाधिक मानधन घेतलं आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
आलिया भट
आपल्या अभिनयाने आलिया भटने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०२४ हे वर्ष अभिनेत्रीसाठी खूपच जास्त खास होतं. आलिया यावर्षी वेदांग रैनासोबत 'जिगरा' चित्रपटात दिसली होती.
जिगरा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नसेल, पण इंग्रजी वेबसाइट मिडच्या न्यूजनुसार, या भूमिकेसाठी अभिनेत्रीने १० ते १५ कोटी रुपये घेतले होते.
तमन्ना भाटिया
बॉलिवूड आणि साऊथची लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या अभिनयासोबतच तिच्या डान्स मूव्ह्समुळे चर्चेत आहे.
अभिनेत्रीने यावर्षीच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'स्त्री २' मध्ये धमाकेदार डान्स केला होता. या तीन मिनिटांच्या गाण्यासाठी अभिनेत्रीने एक कोटी रुपये फी आकारली.
दीपिका पादुकोण
अभिनेत्री दीपिका पादुकोणचे असंख्य चाहते आहेत. यावर्षी ती फायटर आणि कल्की 2898 एडी सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये दिसली.
नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने कल्कीसाठी २० कोटी रुपये घेतले होते. यासह दीपिका या वर्षातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
श्रद्धा कपूर
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, श्रद्धा कपूरने हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री २' साठी ५ कोटी रुपये इतकी मोठी फी वसूल केली होती.