लाल रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये पूजा हेगडेचं खास फोटोशूट; दिसतेय खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:10 IST2025-01-17T18:03:04+5:302025-01-17T18:10:00+5:30

अभिनेत्री पूजा हेगडेचा 'ग्लॅम' लूक, पाहा फोटो

बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री पूजा हेगडे सध्या तिचा आगामी चित्रपट 'देवा'मुळे चर्चेत आहे.

दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.

पूजाने हिंदी, तमिळ तसेच तेलुगू सिनेमांमध्ये काम केलं आहे.

सध्या अभिनेत्री 'देवा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात शाहिद कपूरसोबत ती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

यानिमित्ताने अभिनेत्रीने लाल रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोशूटमुळे पूजाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. शिवाय तिने या फोटोंना लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे.